esakal | नाताळ,नव वर्षासाठी आज नियमावली जाहीर होणार?, पालिकेची महत्त्वाची बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

नाताळ,नव वर्षासाठी आज नियमावली जाहीर होणार?, पालिकेची महत्त्वाची बैठक

नाताळा आणि नववर्ष स्वागतासाठी मुंबई महानगर पालिका आज नियमावली जाहीर करण्याची शक्‍यता आहे.

नाताळ,नव वर्षासाठी आज नियमावली जाहीर होणार?, पालिकेची महत्त्वाची बैठक

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबईः नाताळा आणि नववर्ष स्वागतासाठी मुंबई महानगर पालिका आज नियमावली जाहीर करण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्रीच्या संचार बंदीची गरज नसल्याचे स्पष्ट केले असले तरी रात्रीच्या वेळी जमाव बंदी लागू राहण्याची शक्‍यता आहे. तसेच नववर्षाच्या स्वागताला फटाके फोडण्यावरही बंदी येण्याची शक्‍यता नाकाराता येत नाही.

कोविडमुळे यंदा सर्व सण उत्सव साजरे करण्यावर बंधने आले आहेत. राज्य सरकार आणि महानगर पालिकेने नियमावली तयार करुन त्यानुसार सण साजरे करण्याची परवानगी दिली होती. नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिवाळीतही फटाके फोडण्यास बंदी होती. नववर्षाच्या स्वागतासाठीही मोठ्या प्रमाणात फटाक्‍यांची आतषबाजी होती. त्यामुळे या आतषबाजीवरही यंदा बंदी येण्याची शक्‍यता आहे. तसेच प्रार्थनास्थळे, धर्मस्थळे आता सुरु झाली आहेत. मात्र नाताळ साजारा करण्याबाबतही काही नियमावली तयारी केली जाण्याची शक्‍यता आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पब आणि बारमध्ये पुन्हा वर्दळ होऊ लागली आहे. पहाटे पर्यंत ही नाईट लाईफ सुरु असल्याचे पालिकेच्या लक्षात आले. आतापर्यंत पाच पब आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली. यानंतर पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी राज्य सरकारला पत्र लिहून रात्रीच्या वेळी संचार बंदी लागू करण्याची विनंती केली होती. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी नागरिकांशी संवाद साधताना रात्रीच्या वेळी रात्रीच्या संचार बंदीची गरज नसल्याचे सांगितले. 

हेही वाचा-  गेल्या 5 वर्षात लिंग दर घटला! राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 5 अहवालाची माहिती

महापालिका आज नाताळ आणि नववर्षासाठी नियमावली जाहीर करण्याची शक्‍यता आहे. त्यात जमावबंदी ठेवण्याची शिफारस महानगर पालिकेकडून पोलिसांना केली जाण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर फटाके फोडण्यावरही बंदी येण्याची शक्‍यता आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai Bmc chances announced guidelines christmas and new year celebration

loading image