मोठी बातमीः मुंबई महापालिका रिकामी 'कोविड केअर केंद्र' करणार बंद

मोठी बातमीः मुंबई महापालिका रिकामी 'कोविड केअर केंद्र' करणार बंद

मुंबईः कोरोनानं मुंबईत कहर केला. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनानं मुंबईत कोविड केंद्र सुरु केले. दरम्यान पालिकेनं रिकामे असलेले कोविड केअर केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पैसा आणि मनुष्यबळाची बचत करण्यासाठी कमी जागा असलेल्या कोविड केअर सेंटर (सीसीसी) बंद करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. दरम्यान, पालिका उच्च-जोखीम आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना पाच जंम्बो क्वांरटाईन केंद्रात पाठविण्याची योजना आखत आहे.

शहराला कोविड १९ला झटका बसल्यावर पालिकेनं हॉटेल, शाळा आणि महाविद्यालये, लग्नाची सभागृहे  अशा ठिकाणी क्वांरटाईन केंद्र सुरु केली. तसंच CCC1 रूग्णांच्या उच्च-जोखीम संपर्कासाठी आणि CCC2 या विषाणूजन्य पॉझिटिव्ह रूग्णांसाठी आणि सौम्य लक्षणे असलेल्या खाजगी जागा ताब्यात घेतल्या.

328 वेगवेगळ्या सीसीसी 1 मधील एकूण 50,077 खाटांपैकी सध्या फक्त 6,426 इतक्या खाटा व्याप्त आहे. सीसीसी 2 साठी, बीएमसीने 173 साइट निवडल्या आहेत. त्यापैकी 5,096  खाटांसह ६० साइट उघडण्यात आल्या. त्यात केवळ 1,820 पैकी खाटाच भरल्या आहेत.

याव्यतिरिक्त, महापालिकेने महालक्ष्मी, बीकेसी, मुलुंड, दहिसर आणि गोरेगाव येथे 612 आयसीयू खाटांसह एकूण 7,285 खाटांची क्षमता असलेल्या पाच जंबो सुविधा सुरू केल्या आहेत. बीएमसीनं 7,285 खाटांपैकी 70 टक्के खाजगी रुग्णालयांना आऊटसोर्स केलं, तर सुमारे 2 हजार पालिकेच्या अखत्यारीत आहेत.

अधिकच्या खर्चावर टीका होऊ नये यासाठी सीसीसी 1 आणि सीसीसी 2 सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सर्वात वाईट परिस्थितीत सुमारे 1 लाख लोकांना सामावून घेण्यासाठी खाजगी जागा घेण्यात आल्या. मात्र आतापर्यंत बरीच केंद्रे रिक्त राहिली आहेत, म्हणूनच पैशांची आणि मनुष्यबळाची बचत करण्यासाठी ती केंद्र बंद करण्यात येणार असल्याचं, एका वॉर्ड अधिकाऱ्यानं सांगितलं. 

गरज पडल्यास पालिका ही केंद्रे पुन्हा सुरू करु शकतात हे सांगायला देखील ते विसरले नाहीत. दरम्यान, कायमस्वरुपी संरचनेसाठी रेडी रेकनर (RR) दोन टक्के दर आणि मोकळ्या जागांसाठी किंवा तात्पुरत्या संरचनेसाठी रेडी रेकनर दरापैकी एक टक्के दर देण्यास महापालिकेनं सहमती दर्शविली आहे.  महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, पैसा हा एक घटक आहे. कारण खासगी मालमत्ताधारकांनी वीज आणि पाणी शुल्काची थकबाकी मागण्यास सुरुवात केलीय. मनुष्यबळ ही आणखी एक गंभीर समस्या आहे.

पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, बीएमसी सर्व सीसीसी बंद करणार नाही. आता प्रभाग कार्यालयांना सध्याच्या सीसीसीच्या वापराचा आणि व्याप्ती असलेल्या खाटांचा आढावा घेण्यास सांगितलं आहे.

Mumbai BMC closing Down Empty COVID Care Centres

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com