लॉकडाउनचा गोंधळ; मुंबईकरांना आयुक्त चहल यांचा खास संदेश

राज्य सरकारच्या नियमावलीमुळे मुंबईकरांसमोर होता नवा पेच
लॉकडाउनचा गोंधळ; मुंबईकरांना आयुक्त चहल यांचा खास संदेश
Summary

राज्य सरकारच्या नियमावलीमुळे मुंबईकरांसमोर होता नवा पेच

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर अखेर शनिवारी सरकारने लॉकडाउनचे नवे नियम जाहीर केले. या नियमावलीत राज्यातील जिल्हे पाच टप्प्यात विभागण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता आणि रूग्णवाढीचा दर याच्यावर हे टप्पे ठरवण्यात आले आहेत. या नियमांच्या आधारे मुंबई ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धतेच्या बाबतीत दुसऱ्या टप्प्यात मोडत असली तरी रूग्णवाढीच्या दरामुळे मुंबई तिसऱ्याच टप्प्यात आहे, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनीही मुंबईकरांना एक खास संदेश दिला. (Mumbai BMC Commissioner Iqbal Singh Chahal Clarifies that Mumbai Belongs to level 3 restrictions of Maharashtra Lockdown Guidelines)

लॉकडाउनचा गोंधळ; मुंबईकरांना आयुक्त चहल यांचा खास संदेश
स्लॅब पडताना जर सरकारला कळत नसेल, तर... -प्रवीण दरेकर

मुंबईचा समावेश दुसऱ्या टप्प्यात व्हायला हवा असं विधान पालिका आयुक्तांनी सुरुवातीला केलं होतं. ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धतेच्या दृष्टीने पाहता मुंबईचा दुसऱ्या टप्प्यात समावेश होतो असेही ते म्हणाले होते. पण राज्य आणि केंद्र सरकारच्या नियमांचा नीट आढावा घेतल्यावर त्यांनी मुंबईकरांना संभ्रमातून बाहेर आणले. मुंबई पालिकेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून त्यांनी सर्व मुंबईकरांना सांगितलं की सध्या मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यातच होत आहे. "मुंबईकरांनो, राज्य शासनाच्या 'ब्रेक द चेन' आदेशानुसार मुंबई तिसऱ्या श्रेणीत असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. याविषयी अधिक माहिती लवकरच प्रसारित करण्यात येईल", असं ट्वीट मुंबई पालिकेकडून करण्यात आले आहे.

लॉकडाउनचा गोंधळ; मुंबईकरांना आयुक्त चहल यांचा खास संदेश
कोरोनाची लस रेशनकार्डवर उपलब्ध करून द्या!

महापौर किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

"संपूर्ण राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण मुंबईत सर्वाधिक आहे. तसेच, मुंबईतील बेड ३५ टक्के भरलेले आहेत. ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धतेच्या नुसार जरी मुंबई दुसऱ्या गटात असली तरी मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट हा पाचपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार मुंबई तिसऱ्या गटातच मोडते", असे स्पष्टीकरण महापौरांनी दिले. "मुख्यमंत्री कार्यालाकडून सायंकाळी पुन्हा आकडेवारी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर महापालिका प्रशासन मुंबईसाठीच्या नियमांचे परिपत्रक जाहीर करेल", असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com