
मुंबई : मुंबई महापालिका पर्यावरण संरक्षणासाठी बळकटी देत आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून यंदाच्या वातावरणीय अर्थसंकल्पात भांडवली आणि महसुली खर्चात वाढ करण्यात आली आहे. घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ यांसारखे उपक्रम राबविले जात असल्याची माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली.