
मुंबई पालिका CBSE, ICSE शाळांसाठी देणार 89 लाखांची पुस्तके
पुस्तक खरेदीचा प्रस्ताव सध्या स्थायी समितीत
मुंबई: CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळांसाठी मुंबई महानगर पालिका 89 लाख रुपयांची पुस्तके घेणार आहे. या 12 शाळांमध्ये पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गांसाठी 4 हजार 275 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. महानगर पालिकेने दोन वर्षांपूर्वी CBSE आणि ICSE बोर्डाची प्रत्येकी एक शाळा सुरु केली होती. या शाळांना मिळणारा प्रतिसाद पाहून CBSE बोर्डाच्या 11 नव्या शाळा या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आल्या. एप्रिल महिन्यात लॉटरी पध्दतीने या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. आता पुस्तकांची खरेदी करण्यात येणार असून त्या संबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे. (Mumbai BMC to distribute books worth rupees 89 Lakh to CBSE ICSE students)
पालिका या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत शैक्षणिक साहित्य देणार असल्याची माहिती आहे. या शाळांसाठी पुस्तकांची निवड करण्यासाठी पालिकेने उपशिक्षणाधिकारी यांची समिती नियुक्त केली होती.या समितीने काही एनसीआरटी ने ठरवलेली पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, काही खासगी प्रकाशांच्या पुस्तकांचाही समावेश करण्यात आला आहे.या पुस्तकांची खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी 89 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे.
(संपादन- विराज भागवत)