मुंबई अर्थसंकल्प : BMC सुरु करणार CBSE आणि ICSE शाळा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

मुंबई - मुंबई महानगर पालिकेचा 2020-21 या वर्षीचा शिक्षण विभागाचा 2 हजार 944 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सह आयुक्त आशितोष सलील यांनी शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांना सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महानगर पालिकेने वरळी आणि अंधेरी पुर्व येथे दोन CBSE आणि ICSE शाळा प्रयोगिक तत्वावर सुरु करण्याची घोषण केली आहे. 

मुंबई - मुंबई महानगर पालिकेचा 2020-21 या वर्षीचा शिक्षण विभागाचा 2 हजार 944 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सह आयुक्त आशितोष सलील यांनी शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांना सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महानगर पालिकेने वरळी आणि अंधेरी पुर्व येथे दोन CBSE आणि ICSE शाळा प्रयोगिक तत्वावर सुरु करण्याची घोषण केली आहे. 

पालिकेच्या शाळेतील गरजू गुणवत्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. महापालिकेच्या विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढण्या बरोबरच कौशल्य विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे.डिजीटल दुर्बिणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खगोल निरीक्षण करता येणार आहे. 

मोठी बातमी -  कोरोनामुळे चीनच्या वाहन कंपनीचा भारतातील प्रवेश रोखला 

या अर्थसंकल्पात महानगर पालिकेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी तसेच नव्या शाळा बांधण्यासाठी 326 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या एकात्मीक कलागुणांना प्रोत्साहन देणे,लिंगभेदाची भावना कमी करुन स्त्री पुरुष समानता निर्माण करणे या हेतून "चेंजींग मुव्हस,चेंजिंग माईंड'हा उपक्रम ब्रिटीश कॉन्सिल, रॉयल अकॅडमी ऑफ डान्स आणि मरीलेबोन क्रिकेट क्‍लब यांच्या सहाय्याने महापालिका शाळेत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वरळी येथील वुलन मिल शाळेत आयसीसएसई बोर्डची शाळा तर अंधेरी पुर्व येथील पूनम नगर शाळेत सीबीएसई बोर्डाची शाळा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे.

मोठी बातमी -  'आई अंकल येईल..'; आणि आईच्या पायाखालची जमीनच सरकली..

  • डिजीटल क्‍लास रुमसाठी 29 कोटी आणि व्हर्च्युअल क्‍लासरुमासाठी 11 कोटी 59 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
  • आव्हानात्मक विशेष मुलांच्या शाळांमध्ये हॅन्ड सॅनिटायझर बसविण्यात येणार आहे.17 शाळांमध्या हॅन्डसॅनिटायझर बसवण्यासाठी 1 कोटी 84 लाख रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
  • गुणवत्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील महापालिकेच्या 25 विद्यार्थ्यांना पदवी पर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.त्यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
  • विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता आणि जिज्ञासू वृत्ती वाढून वैज्ञानिक दृष्टीकोन तयार करण्यासाठी 5 ते 8 इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी "टिकरींग लॅब'सुरु करण्यात येणार आहे. यासाठी 2 कोटी 27 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

मोठी बातमी -  'या' पोराने 'गुगल'ला येडा बनवून खाऊ घातला पेढा..

  • 25 माध्यमिक शाळांमध्ये ई-बुक व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यात येणार आहे.त्यासाठी 1 कोटी 45 लाख रुपयांची तरतूद 
  • खगोल,भूगोल आणि आरोग्य या विषयांवरील चलत प्रतिकृतींचे विद्यार्थ्यांना प्रात्याक्षित पाहाता यावे म्हणून विज्ञान कुतूहल भवन तयार करण्यात येत आहे.विक्रोळी येथील हरियाली आणि विलेपार्ले येथील महापालिकेच्या शाळेत हे भवन तयार करण्यात येत आहे.
  • विज्ञान कतुहल भवनात डिजीटल दुर्बिण बसवून छोटी वेधशाळा तयार करण्यात येणार आहे.यातून अवकाशातील ग्रह तारे तसेच इतर खगोलिया घडामोडींचा प्रत्यक्ष अनुभव एका वेळी 200 विद्यार्थ्यांना मोबाईल फोनवरुन घेता येणार आहे. 

मोठी बातमी - जेव्हा कुणाल कामरा थेट राज ठाकरेंना उघडपणे देतो लाच...

  • घंटा वाजवून पाणी पिण्याची आठवण विद्यार्थ्यांना करुन देण्यात येणार आहे.एका सत्रात तीन वेळा पिण्याच्या पाण्याची घंटा वाजवली जाणर आहे. 
  • हाय फाय युथ फांऊडेशनच्या वतीने तीन शाळांमध्ये बास्केटबॉलचे मैदान तयार करण्यात येत आहे.तर,89 शाळांमध्ये खेळांची साधने पुरविण्यात येणार आहे.
  • विद्यार्थ्यांमधील इंग्रजी भाषेची भिती कमी करण्यासाठी भाषा प्रयोगशाळा तयार करण्यात येणार आहे.25 शाळांमध्ये ही प्रयोग शाळा सुरु करण्यात येईल. 

मोठी बातमी - एअरटेल ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी..

दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 
महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यता येते.साधार 4 हजार 963 विद्यार्थ्यांना यंदा शिष्यवृत्ती देण्याची प्रक्रिया सुरु असून आगामी वर्षात यासाठी 8 कोटी 7 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

विद्यार्थ्यांना वस्तूच मिळणार 
केंद्र सरकारच्या धोरणानुसार महापालिकेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तु देण्याऐवजी थेट पैसे त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, या निर्णयाला सत्ताधारी शिवसेनेने विरोध केला होता. आगामी वर्षात विद्यार्थ्यांना 27 शैक्षणिक वस्तुंच देण्यात येणार आहे. यासाठी 111 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

mumbai budget BMC allots budget for CBSC and ICSC schools in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai budget BMC allots budget for CBSE and ICSE schools in mumbai