
बुधवारी मुंबईहून एलिफंटा लेण्यांकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीसोबत झालेल्या अपघाताने संपूर्ण राज्य हादरले आहे. अरबी समुद्रात नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी बोटीला जोरदार धडक दिल्याने बोट उलटली. या भीषण दुर्घटनेत १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बदलापूर येथील नौदल कर्मचारी मंगेश केळशीकर यांचाही समावेश आहे.