Bullet Train : मुंबईतील बुलेट ट्रेनच्या कामाला वेग; बीकेसीतील २ रस्ते वळविले

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील एकमेव भूमिगत मेट्रो स्थानकाच्या बांधकामास वेग आला आहे.
bullet train project
bullet train projectsakal

मुंबई - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील एकमेव भूमिगत मेट्रो स्थानकाच्या बांधकामास वेग आला आहे. मुंबईतील बीकेसी टर्मिनस हे या संपूर्ण मार्गातील एकमेव भूमिगत स्थानक आहे. या मार्गाच्या बांधकामासाठी आता बीकेसीतील २ मार्ग पूर्णतः बंद करण्यात आले आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन टर्मिनसच्या या कामासाठी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी या दोघांना कंत्राट दिलेले आहे. या स्थानकाच्या बांधकामासाठी बीकेसीतील दोन रस्ते वाहतुकीसाठी बंद कऱण्यात आले आहे.

सोमवार ता. ११ रोजी वाहतुकीच्या हालचालींवर निर्बंध घालणारी वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली. या अधिसूचनेनुसार, एमएमआरडीए मैदानावर बीकेसी वाहतूक विभागाच्या कार्यक्षेत्रातील डायमंड जंक्शन ते जे.एस.डब्लू. कार्यालय आणि बीकेसी रोड प्लॅटिना जंक्शन ते मोतीलाल नेहरू नगर ट्रेड सेंटर हे मार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. हे आदेश दिनांक १२/०९/२०२३ ते दिनांक ३०/०६/२०२४ पर्यंत लागू असेल.

सोमवारी रस्ते बंद केल्याच्या पहिल्या दिवशी यामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु होती. याचसोबत, वाहतुकीसाठी देण्यात आलेल्या पर्यायी मार्गांवरदेखील कोणतीही अतिरिक्त वाहतूक कोंडी आढळून आली नाही.

सुरुवातीला वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांचा आढावा घेतला जात असून. बंद करण्यात आलेल्या मार्गांवर बॅरिकेटिंग आणि इतर सुधारणा याचा संपूर्ण आढावा आणि अंदाज घेऊनच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बीकेसी वाहतूक पोलिसांनी दिली.

नो एन्ट्री

  • एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसरातून येणाऱ्या वाहनांना बीकेसी रोड डायमंड जंक्शनमार्गे डावे-उजवे वळण घेऊन खेरवाडी परिसरातील जेएसडब्ल्यू कार्यालयाकडे 'नो एन्ट्री' असेल.

  • खेरवाडी परिसरातून, एशियन हार्ट हॉस्पिटलमधून येणाऱ्या आणि जेएसडब्ल्यू ऑफिस/एमएमआरडीए ऑफिस/जे कुमार वॉर्डमधून डायमंड जंक्शन, बीकेसी भागात डाव्या-उजवीकडे टम घेऊन जाणाऱ्या वाहनांना ‘नो एन्ट्री’ असेल.

  • एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसर, बीकेसी रोड स्ट्रीट नंबर १०, प्लॅटिना जंक्शन येथून मोतीलाल नेहरू नगर व्यापार केंद्राकडे डावे-उजवे वळण घेऊन येणाऱ्या वाहनांना ‘नो एन्ट्री’ असेल.

  • मोतीलाल नेहरू नगर ट्रेड सेंटर, बीकेसी फायर स्टेशनकडून प्लॅटिना जंक्शन आणि बीकेसी परिसरात येणाऱ्या वाहनांना ‘नो एन्ट्री’ असेल.

पर्यायी मार्ग

  • एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसरातून बीकेसी रोड, डायमंड जंक्शन, जेएसडब्ल्यू कार्यालयातून खेरवाडी भागाकडे जाणारी वाहने डायमंड जंक्शन/नाबार्ड जंक्शन-उजवीकडे वळण-एशियन हार्ट हॉस्पिटल-जेएसडब्ल्यू कार्यालय आणि खेरवाडी परिसरातून पुढे जातील.

  • खेरवाडी परिसर-एशियन हार्ट हॉस्पिटल-जेएसडब्ल्यू कार्यालयाकडील वाहनांची वाहतूक नाबार्ड जंक्शनपासून बीकेसी क्षेत्राकडे डावीकडे वळण घेऊन पुढे जाईल.

  • एमटीएनएल जंक्शन, रज्जाक जंक्शन, कुर्ला, बीकेसी परिसरातून मोतीलाल नेहरू नगरच्या दिशेने जाणारी वाहने एमटीएनएल जंक्शन येथे डावीकडे वळण घेऊन त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जातील.

  • मोतीलाल नेहरू नगर व्यापार केंद्राकडील वाहनांची वाहतूक आणि प्लॅटिना जंक्शन - बीकेसी क्षेत्राकडे जाणारी वाहतूक व्यापार केंद्राकडे डावीकडे-उजवीकडे वळण घेईल आणि एमटीएनएल जंक्शन मार्गे गंतव्यस्थानाकडे जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com