
मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील यशवंत नगर येथील 32 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट राज मोरे यांनी ब्लॅकमेलमुळे जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज यांनी विष प्राशन करून जीवन संपवले. त्यांनी मागे ठेवलेल्या तीन पानांच्या सुसाइड नोटमधून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. दोन आरोपी, राहुल परवानी आणि साबा कुरेशी, यांनी राज यांचा खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन गेल्या 18 महिन्यांत 3 कोटींहून अधिक रकमेची खंडणी उकळल्याचा आरोप आहे.