Mumbai Carnac Bridge : आजपासून १५४ वर्षे जुना कर्नाक उड्डाणपूलाचे तोडकाम होणार सुरू

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वात जुना कर्नाक उड्डाणपूलाचा पाडकामाला आजपासून सुरुवात होणार आहे.
mumbai carnac bridge
mumbai carnac bridgesakal
Summary

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वात जुना कर्नाक उड्डाणपूलाचा पाडकामाला आजपासून सुरुवात होणार आहे.

मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील सर्वात जुना कर्नाक उड्डाणपूलाचा पाडकामाला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे पाडकामासाठी मध्य रेल्वेने २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे.सीएसएमटी ते मस्जिद बंदर स्थानकातील कर्नाक पुलाची निर्मिती १९६८ मध्ये झालेली असून, त्यास १५४ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा पूल धोकादायक ठरविण्यात आला होता.

कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी २७ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमध्ये ४०० कामगार, १०० सुपरवायझर आणि मध्य रेल्वेचे ३० ते ३५ अधिकाऱ्यांचा देखरेखीत हा पूल पाडण्यात येणार आहे. प्रत्येक शिफ्टला हेल्पर ५० गॅस कटरचा वापर करून हा पूल तोडण्यात येणार आहे. या कामासाठी एकूण ३०० गॅस सिलिंडरचा वापर करण्यात येणार आहे. तसेच कर्नाक उड्डाणपूलाचे कापलेले हिस्से उचलण्यासाठी ३५० टन क्षमतेच्या तीन क्रेन आण एक क्रेन ५०० टन क्षमतेची तैनात असणार आहे.

गेल्या तीन महिन्यात कर्नाक उड्डाणपूलांचा ६०० क्युबिक मीटर डेब्रिज काढले (३०० ट्रक) आहे. तर पुलाचे स्टील बांधकाम - ५० मीटर आणि १८ मीटर एकूण स्पॅन ७. स्पॅन काढण्यासाठी ४४ टप्प्यात काम करण्यात येणार आहे.

शेवटी लोकल -

२७ तासांचा ब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसएमटीवरून शेवटची धीम्या मार्गावरील रात्री १०. २८ खोपोली लोकल सुटणार आहे, तर जलद मार्गावरील शेवटची ९. ५८ खोपोली लोकल सुटणार आहे. तर सीएसएमटीकडे येणारी शेवटची रात्री १०. ४८ बदलापूर-सीएसएमटी धीमी लोकल येणार आहे, तर जलद मार्गावरील रात्री १०.२८ ची कर्जत सीएसएमटी लोकल येणार आहे. त्यानंतर सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल सेवा बंद असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com