
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने गेल्या अकरा महिन्यात १८.०८ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत १०० कोटी रुवयांचा दंड वसूल केला आहे.
Mumbai Central Railway : फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत मुंबई विभागाने रचला इतिहास!
मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने गेल्या अकरा महिन्यात १८.०८ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत १०० कोटी रुवयांचा दंड वसूल केला आहे. अशी उल्लेखनीय कामगिरी करणारा मुंबई विभाग हा भारतीय रेल्वेतील पहिला विभाग ठरला आहे.
मध्य रेल्वेने विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय लोकल गाड्या, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. रेल्वेचा तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते २६ फुब्रवारी २०२३ या कालावधीत १८. ०८ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. या कारवाईत १००. ३१ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

गेल्या वर्षीच्या याच कालावधीत १०. ०३ लाख प्रकरणांतून ६१. ६२ कोटी रुपये महसूलाची नोंद झाली होती. यातून महसुलात ६२ .७९ टक्यांनी आणि प्रकरणांच्या संख्येत ५०.३२ टक्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे एसी लोकलमधील २५ हजार ७८१ प्रकरणांमधून ८७. ४३ लाख आणि प्रथम श्रेणी डब्यांमधील १. ४५ लाख प्रकरणांमधून ५.०५ कोटी महसूलाचा समावेश आहे.