Central Railway : २७ तासांच्या ब्लॉकमध्ये मध्य रेल्वे करणार ९०० तासांचे काम

मध्य रेल्वे कर्नाक उड्डाणपूल पाडकामासाठीच्या २७ तासांच्या ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉककालावधीत 'नो ट्रेन झोन'मध्ये मध्य रेल्वेने शॅडो ब्लॉकमध्ये विविध रखडलेले विविध काम करण्यात येणार आहे.
Central Railway Work
Central Railway WorkSakal
Summary

मध्य रेल्वे कर्नाक उड्डाणपूल पाडकामासाठीच्या २७ तासांच्या ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉककालावधीत 'नो ट्रेन झोन'मध्ये मध्य रेल्वेने शॅडो ब्लॉकमध्ये विविध रखडलेले विविध काम करण्यात येणार आहे.

मुंबई - मध्य रेल्वे कर्नाक उड्डाणपूल पाडकामासाठीच्या २७ तासांच्या ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉककालावधीत 'नो ट्रेन झोन'मध्ये मध्य रेल्वेने शॅडो ब्लॉकमध्ये विविध रखडलेले विविध काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे सुमारे ९०० तासांइतके काम करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे

मध्य रेल्वेवरील कर्नाक पुल धोकादायक ठरविण्यात आला होता. त्यानंतर २२ ऑगस्ट २०२२ पासून वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला होता. या उड्डाणपुल तोडकामाला केले जात असून मध्य रेल्वे गर्डर काढण्यासाठी २७ तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे. मध्य रेल्वे १९ नोव्हेंबरला रात्री ११ पासून ते २१ तारखेला मध्य रात्री २ वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक आहे. याकाळात सीएसएमटी ते मस्जिद दरम्यानच्या सर्व सहा मार्गिका, ७ वी मार्गिका आणि यार्डवर हा ब्लॉक असेल.

२७ तासांच्या ब्लॉकचा पुरेपूर फायदा घेऊन, शॅडो ब्लॉक्स घेण्यात येणार आहे. ज्यामुळे रेल्वेला भविष्यातील ब्लॉक कालावधीत सुमारे ९०० तासांची बचत होणार आहे. यामध्ये अभियांत्रिकीचे ५०५ तास, ओव्हरहेड इक्विपमेंटचे २३५ तास आणि सिग्नल अँड टेलिकॉमचे १६० तासांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर सुमारे २००० कामगार शॅडो ब्लॉकमध्ये या विभागाची देखभाल करतील. सहा टॉवर वॅगन आणि अभियांत्रिकी यंत्रसामग्रीची १० वाहने वापरली जातील.

ट्रॅक नूतनीकरण २.४ किमीचे, १ किमीचे मॅन्युअल डीप स्क्रीनिंग, ३०० स्लीपर बदलणे आणि इतर कामे जसे की प्लेन ट्रॅक टँपिंग, टर्नआउट टँपिंग, स्विच रिप्लेसमेंट, टर्नआउट्स आणि ट्रॅकचे मॅन्युअल लिफ्टिंग, सिग्नल, लोकेशन बॉक्स, ट्रॅक वायर, जंपर्स बदलणे , पॉइंट मशीन रॉडिंग आणि केबल मेगरिंग इत्यादी कामे शॅडो ब्लॉकमध्ये केली जातील. २३ बीआरएन आणि २ इएमयू चा समावेश असलेल्या मक स्पेशलद्वारे ५००० घनमीटर गाळ काढला जाईल.

प्रवाशांची मदतीसाठी हेल्पडेस्क -

ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत म्हणून मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, ठाणे, वडाळा रोड आणि पनवेल स्थानकांवर हेल्पडेस्क सुरू केली आहेत. हे हेल्पडेस्क तिकीट तपासणी कर्मचार्‍यांकडून आरपीएफ च्या सहाय्याने चालवले जातील.

अतिरिक्त एटीव्हिएम सुविधा -

अतिरिक्त आरक्षण / रद्दीकरण काउंटर महत्वाच्या स्थानकांवर उघडले जात आहेत. यामध्ये सीएसएमटी, दादर, भायखळा, पनवेल, नाशिक, पुणे स्थानकाचा समावेश आहे. तर प्रवाशांच्या फायद्यासाठी अतिरिक्त एटीव्हिएम सुविधा मदतनीस सेवेत असतील. यामध्ये दादर भायखळा, वडाळा, परळ या स्थानकांचा समावेश आहे. 

शॅडो ब्लॉक म्हणजे काय?

शॅडो ब्लॉकचे काम नो ट्रेन झोनमध्ये म्हणजे मुख्य मार्गावरील सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान तसेच हार्बर मार्गावरील सीएसएमटी आणि वडाळा रोड दरम्यान केले जाणार आहे. सीएसएमटी -भायखळा विभागात आणि सीएसएमटी - वडाळा रोड विभागात अनेक मार्गांवर हे काम केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com