मुंबई : सोनसाखळी चोराला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

thief arrested

मुंबई : सोनसाखळी चोराला अटक

मुंबई : लोकल प्रवाशाच्या गळ्यातील चैन खेचून पलायन करणाऱ्या चोराला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. रविवारी ता.२४ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या दादर फलाट क्र. ३ वर विरार-चर्चगेट लोकल आली असता, लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून चोराने पळ काढला.

प्रवाशाने यासंदर्भात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोराचा मागोवा घेण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून पाच दिवसात चोराला अटक केली. या चोराकडून २० ग्रॅम वजनाची सोनसाखळी जप्त केली आहे.

Web Title: Mumbai Chain Thief Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top