मुंबईतील चार्टर्ड अकाऊंटंटची इगतपुरीत आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide

मुंबईतील एका चार्टर्ड अकाउंटंटने नाशिक मधील इगतपुरीत आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

Suicide : मुंबईतील चार्टर्ड अकाऊंटंटची इगतपुरीत आत्महत्या

मुंबई - मुंबईतील एका चार्टर्ड अकाउंटंटने नाशिक मधील इगतपुरीत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चिराग वरैया असे मृत चार्टर्ड अकाऊंटंटचे नाव असून ते मुंबईतील मुलुंड येथील रहिवाशी आहे. रविवारी रात्री नाशिकच्या इगतपुरी येथील एका रिसॉर्टमध्ये आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिका-यांना संशय आहे की मृत चिराग वरैया, तणावग्रस्त होते ज्याचं कारण कारण तीन आठवड्यांपूर्वी भांडुपमधील एका पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

मृत चिराग वरैया यांनी शुक्रवारी आपल्या मालकाला आपल्याला शनिवार व रविवार आराम करायचा असल्याचे सांगितले आणि ते कंपनीची कार आणि ड्रायव्हरलासोडून इगतपुरी येथील एका रिसॉर्टमध्ये गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरैया इगतपुरी येथील एका स्थानिक मंदिरात गेले होते. त्यांनी शनिवारी ड्रायव्हरला सांगितले की ते सोमवारी मुंबई शहराकडे रवाना होतील आणि तोपर्यंत त्यांना त्रास देऊ नये. सोमवारी सकाळी जेव्हा ड्रायव्हर वरैयाच्या खोलीत त्याला घेण्यासाठी गेला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यानंतर त्यांनी रिसॉर्ट मालकांना माहिती दिली. रिसॉर्ट मालकांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा त्यांना चिराग वरैया मृत अवस्थेत आढळले. त्यांच्याकडे एक सुसाइड नोट देखील सापडली ज्यामध्ये त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांची माफी मागितली आणि आपल्या पत्नीला त्यांच्या मुलांची काळजी घेण्यास सांगितले. कुटुंबीयांनी काही वेळातच इगतपुरीत येऊन मृतदेह स्वीकारला.रेकॉर्ड तपासल्यावर पोलिसांना आढळले की गेल्या महिन्यात भांडुप स्टेशनवर वरैया विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.