esakal | संकटकाळात CIDCO उभारतेय मोठी हॉस्पिटल्स

बोलून बातमी शोधा

Hospital Logo
संकटकाळात CIDCO उभारतेय मोठी हॉस्पिटल्स
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर सिडको मुंबई आणि नवी मुंबई भागात दोन मोठी कोविड केंद्रे उभी करणार आहे. कांजूरमार्ग आणि कळंबोली भागात ही कोविड सेंटर्स उभारली जाणार आहेत.

कांजूरमार्ग येथे २ हजार बेड्सचे कोविड हॉस्पिटल उभारण्यात येईल. त्यात २०० बेड्स ICU चे असतील. "कांजूरमार्ग येथे उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरमध्ये ७० टक्के ऑक्सिजन बेड्स असतील. या सेंटरचे काम प्रगतीपथावर आहे" अशी माहिती आयएएस अधिकारी संजय मुखर्जी यांनी टि्वट करुन दिली.

हेही वाचा: स्कूल बस बंद: मुंबईत २४ हजार लोकांनी गमावल्या नोकऱ्या

कंळबोली येथे उभारण्यात येणारे कोविड सेंटर ८०० बेड्सचे असेल. इथे सुद्धा आयसीयू आणि ऑक्सिजन बेड्स असतील. "याआधी मुलूंड, कळंबोली येथे प्रदर्शन सेंटर आणि द्रोणागिरी हॉस्पिटल बांधले आहे" असे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईमध्ये शुक्रवारी ४ हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. वाढणारा मृतांचा आकडा ही चिंतेची बाब आहे. मुंबईत आता ६१ हजारपेक्षा जास्त सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.