esakal | स्कूल बस बंद: मुंबईत २४ हजार लोकांनी गमावल्या नोकऱ्या

बोलून बातमी शोधा

School Bus
स्कूल बस बंद: मुंबईत २४ हजार लोकांनी गमावल्या नोकऱ्या
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: कोरोना व्हायरसमुळे मागच्या वर्षभरापासून मुंबईत शाळा बंद आहेत. आता कोरोनाची दुसरी लाट असल्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मागच्या वर्षभरापासून शाळा या पूर्ण क्षमतेने सुरुच होऊ शकल्या नाहीत. परिणामी या शाळांवर अवंलबून असलेल्या स्कूल बस उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. शाळा बंद असल्यामुळे स्कूल बसच्या व्यवसायातील २४ हजार लोक बेरोजगार झाले आहेत.

"मुंबईत मागच्या वर्षभरापासून ८ हजार स्कूल बसेस शालेय विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर धावलेल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक बसमधील चालक, कंडक्टर आणि महिला अटेंडंट बेरोजगार झाले आहेत" असे स्कूल बस ओनर्स असोशिएशनचे अनिल गर्ग म्हणाले. बस आणि कार ऑपरेटर्सच्या कॉनफेडरेशन ऑफ इंडियानुसार, महाराष्ट्रात ५० हजार स्कूल बसेस आहेत. त्यामुळे दीड लाख नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे.

हेही वाचा: मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट होतेय, पण...

बेस्टने स्कूल बसेसना सार्वजनिक वाहतुकीची परवानगी द्यावी, अशी मागणी गर्ग यांनी केली आहे. ही परवानगी मिळाली, तर गर्दीच्यावेळी नोकरदारांची वाहतुक करता येईल. यामुळे बेस्टच्या ताफ्यातील बस तीनपटीने वाढतील व छोट्या बसेस अरुंद गल्ल्यांमधुन सहजतेने धावू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा: मुंबईकरांनो लक्ष द्या! लॉकडाउन गाईडलाईन्सचा 'हा' मेसेज करू नका फॉरवर्ड

बेस्टकडे ४३०० बेससचा ताफा असून त्यांनी MSRTC कडून काही बसेस भाड्यावर घेतल्या आहेत. "सध्या ऑनलाइन वर्ग सुरु आहेत. त्यामुळे शाळांनी बस मालकांना पैसे देण्यास नकार दिला आहे. कारण पालक वर्ग शाळा सुरु नसल्यामुळे बसेसची फी भरत नाही. त्यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. अनेकांनी कर्ज काढून बसेस विकत घेतल्या आहेत. त्यांना आता महिन्याचे EMI हफ्ते भरणे जमत नाहीय" असे गर्ग यांनी सांगितले.