मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत घट, जाणून घ्या सविस्तर माहिती

corona update
corona updatesakal media
Updated on

मुंबई : मुंबई शहरातील (Mumbai city) 2,834 एकूण सक्रिय (corona active patient) रुग्णांपैकी जवळपास 70 टक्के हे लक्षण असलेले (symptoms) तर फक्त 850 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. मुंबई शहरात कोविड -19 रुग्णांचा (corona situation) कल गेल्या महिन्यापेक्षा बदलला आहे. जुलैमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या लक्षणे असलेल्या रुग्णांपेक्षा जास्त होती. मात्र, आता हा ट्रेंड उलट झाला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या (पालिका) डॅशबोर्डवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, शहरात लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. एकूण सक्रिय रुग्णांच्या 70 टक्के म्हणजेच 1529 एवढे रुग्ण कोरोनाची लक्षणे असलेले आहेत. तर, सक्रिय रुग्णांमध्ये 455 गंभीर आहेत आणि 850 लक्षणे नसलेले आहेत. तर, पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते बरेच जण होम क्वारंटाईनमध्ये होते. अनेकांनी रुग्णालयात दाखल न होताच घरीच उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर, बऱ्याच रुग्णांनी लक्षणे असूनही सामान्य चिकित्सकांकडून घरी उपचार घेतले.

सोमवारी पालिकेच्या डॅशबोर्डनुसारच लक्षणे नसलेल्या रुग्णांपेक्षा लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. शहरात दररोज कोविड -19 रुग्णांमध्ये हळूहळू घट झाल्याची नोंद आहे. त्यामुळे, बेड उपलब्धता ही सहज सोपी झाली आहे. रुग्णांमध्ये घटती संख्या याच कारणामुळे मुंबईतील बेड्स रिक्त आहेत.

corona update
रस्त्यांवरील चांद्रभूमी मिटणार ; माणेरे गाव व आजूबाजूचे रस्ते होणार चकाचक

मुंबईतील सद्यस्थिती (डॅशबोर्डनुसार)

एकूण रुग्ण - 7,39,336

सक्रिय रुग्ण - 2,834

लक्षण नसलेले - 850  (30%)

लक्षण असलेले - 1529 (54%)

गंभीर - 455 (16%)

डिस्चार्ज  - 7,18,083 (97%)

मृत्यू - 15,989 ( 2 टक्के)

12 टक्के बेड्स भरलेले

सध्या, विविध सुविधांमध्ये एकूण 21,103 बेड उपलब्ध आहेत, ज्यात कोविड केअर सेंटर, समर्पित कोविड आरोग्य केंद्रे आणि समर्पित कोविड रुग्णालये यांचा समावेश आहे. अगदी ऑक्सिजनयुक्त बेड ही फक्त 11 टक्के भरलेले आहेत. सर्व सुविधांमध्ये 18,593 बेड रिक्त असताना, आणखी काही जंबो केंद्र पालिकेच्या ताफ्यात सामील होणार आहेत.

 एकूण बेड्स  - 21,103

रिक्त बेड्स - 18,545

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com