esakal | काळ आला होता पण वेळ नाही; दादर रेल्वे स्थानकातील थरारक प्रसंग
sakal

बोलून बातमी शोधा

dadar terminus

काळ आला होता पण वेळ नाही; दादर रेल्वे स्थानकातील थरारक प्रसंग

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: मागच्या काही दिवसात मुंबईत लोकल प्रवास (Mumbai local travel) महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे अनेक घटनांमधून समोर आले आहे. मुंबईत लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. पण तरीही महिलांविरोधात गुन्हे घडतच (crime against women) आहे. आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्थानकात एका महिलेला मोबाइल चोरामुळे (Mobile thief) आपले प्राण गमवावे लागले होते. अगदी तशाच प्रकारची घटना पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात (western railway dadar) घडली. सुदैवाने मोबाइल चोराचा पाठलाग करणाऱ्या महिलेचे प्राण वाचले. रेल्वे पोलिसांनी चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Women injured while catching mobile thief incident happened at dadar railway station)

दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 4 वर गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. विरार वरून सुटलेली लोकल संध्याकाळी पावणे पाचच्या दरम्यान दादर स्थानकात आली. याच लोकलमध्ये स्नेहल हूलके नावाची महिला प्रवास करत होती. पण तिच्या नकळत मागून येऊन एका व्यक्तीने तिच्या हातातला मोबाईल घेतला आणि धावत्या ट्रेनमधून खाली उतरला.

हेही वाचा: मुंबईत लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना सवलती मिळू शकतात - BMC

मोबाइल गेल्याचे लक्षात येताच स्नेहल देखील त्याच्या मागे धावली मात्र तिने पाय बाहेर टाकताच प्लॅटफॉर्म संपल्याने ती थेट रुळांवर पडली. तिचे सुदैव म्हणावे लागेल म्हणून ती लोकलच्या चाकाखाली आली नाही. मात्र या घटनेत तिला गंभीर दुखापत झाली आहे.

हेही वाचा: वसईत घराच्या बाथरुममध्ये घुसून महिलेची हत्या

पोलिसांनी ही घटना लक्षात येताच त्यांनी त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले पण ताबडतोब आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने 2 तपास पथकांनी 3 तासात राहुल बुटिया या आरोपीला अटक केली. त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे कबूल केले. त्याच्याकडून 17 हजारांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

loading image