
लहान नाले, पर्जन्य पेटिकांच्या सफाईसाठी महानगर पालिकेने जानेवारी महिन्यात निविदा मागवल्या आहेत.
मुंबई: लहान नाले, पर्जन्य पेटिकांच्या सफाईसाठी महानगर पालिकेने जानेवारी महिन्यात निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे यंदाही नाले सफाई विलंबाने सुरु होण्याची शक्यता असून पावसाळा सुरु होईपर्यंत नाले सफाई सुरुच राहण्याची शक्यता आहे.
पावसाच्या तोंडावर दरवर्षी नाले सफाई केली जाते. मात्र ही नाले सफाई नेहमीच वादात सापडायची. विलंबाने होणाऱ्या नालेसफाईमुळे नेहमीच पालिका प्रशासनाला लक्ष केले जाते. त्यामुळे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात निविदा मागविण्यात आल्या. मात्र यंदा जानेवारी महिन्यात निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष नाले सफाई कधी सुरु होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
28 जानेवारी पर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरु होण्यास किमान 1 ते दिड महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे यंदा पावसाच्या तोंडावर नाले सफाई सुरु राहणार आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पश्चिम मुंबईतील काही लहान नाल्यासाठी वर्षभरात कंत्राटदार न मिळाल्यास महानगर पालिकेनं गेल्या वर्षीच्याच कंत्राटदारांना कामे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिकेने अंदाजित दरापेक्षा 5 ते 22 टक्के खर्च जास्त करणार आहे. नाले सफाईच्या सुमारे 48 कामांसाठी दरवर्षी निवीदा काढल्या जातात. मुंबईत नाले आणि नद्या मिळून सुमारे 689 किलोमीटरच्या पर्यजन्य वाहिन्यांची सफाई केली जाते.
नाल्यांचा प्रकार -लांबी किलोमीटरमध्ये
मोठे नाले - 247.84
लहान नाले - 421.36
मिठी नदी - 22.25
पर्जन्य पेटिका - 2 हजार किलोमीटर
सफाई कशाची
लहान नाले,पर्जन्य पेटिका,मोऱ्या,बॉक्स ड्रेन आणि पाईप ड्रेन
काय होऊ शकते
निविदा भरण्याची मुदत जानेवारी 27 पर्यंत असल्याने प्रत्यक्ष काम फेब्रुवारी अखेर पर्यंतसुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नाले सफाई सुरु असते. यंदा तो पर्यंतही नाले सफाईचे काम पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे. पावसाळ्या पूर्वी 70 टक्के नाले सफाई केली जाते. पावसाळ्यादरम्यान 15 आणि पावसाळ्यानंतर पुन्हा 15 टक्के नाले सफाई केली जाते.
हेही वाचा- खासगी वाहनातून फिरताना आता मास्क न लावता बिनधास्त फिरा, कारवाई होणार नाही
-------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
mumbai cleansing drainage Tender submission deadline bmc