esakal | सागरी किनारी मार्ग: बोगद्याचे ३३० मीटर लांबीचे काम पूर्ण

बोलून बातमी शोधा

सागरी किनारी मार्ग: बोगद्याचे ३३० मीटर लांबीचे काम पूर्ण
सागरी किनारी मार्ग: बोगद्याचे ३३० मीटर लांबीचे काम पूर्ण
sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: सागरी किनारी मार्गासाठी बांधण्यात येणाऱ्या बोगद्याचे 330 मीटर लांबी पर्यंत काम पूर्ण झाले आहे. प्रियदर्शनी पार्क ते नरीमन पॉईट पर्यंत २.७ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे बांधण्यात येणार आहेत. नरीमन पॉईंट ते वरळी पर्यंतच्या 15 किलोमिटर पेक्षा अधिक लांबीच्या सागरी किनारी मार्गासाठी प्रिय दर्शनी पार्क येथून मलबार हिल, गिरगाव चौपाटी खालून हा बोगदा बांधण्यात येणार आहे.

जमिनीच्या 20 ते 70 मीटर खालून हा बोगदा बांधण्यात येणार आहे. महानगर पालिकेचे या टनल बोरींग मशिनचे नामकरण मावळा असे केले आहे. या बोरींग मशिनने 11 जोनवारी पासून खोदमाला सुरवात केली असून आता पर्यंत 330 मीटरचे खोदकाम पूर्ण झाले आहे, अशी माहिती आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. महापौरांनी आज प्रत्यक्ष जाऊन या कामाचा आढावा घेतला.

हेही वाचा: मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाडचे कोरोनाने निधन

हे टनेल बोरींग मशिन आता पर्यंत भारतात वापरले गेलेले सर्वात मोठे मशिन आहे. या मशिनचा व्यास 12.19 मिटर असून लांबी 80 मीटर आहे. सध्या प्रियदर्शनी पार्क पासून खोदकाम सुरु झाले आहे. नरीमन पॉईंट पर्यंतचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर ही मशिन बाहेर काढून पुन्हा प्रियदर्शनी पार्क येथे आणण्यात येईल. तेथून पुन्हा दुसऱ्या बाजूच्या बोगद्याचे खोदकाम सुरु होणार आहे. 2022 च्या मध्या पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.