esakal | मुंबई : कोकेनची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, ७० लाखांचा माल जप्त I Mumbai
sakal

बोलून बातमी शोधा

two arrested

मुंबई : कोकेनची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, ७० लाखांचा माल जप्त

sakal_logo
By
राहुल शेळके

मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून मुंबई पोलिसांना अंमली पदार्थांबाबतच्या तस्करीबद्दल दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा आणि अंमलीपदार्थ विरोधी पथकाने यासाठी मोहीम हाती घेतली होती. ड्रग्ज विक्री करणारे, पुरवठा करणारे तसेच त्याचा साठा करणाऱ्यांवर बारीक नजर ठेवली जात आहे. त्यानुसार दोन परदेशी नागरिकांना ड्र्ग्ज तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मुहम्मद नौमान शाहिद कुरेशी आणि याकूब माचो नागानी या दोन व्यक्तींवर मुंबई पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी २२५ ग्रॅम कोकेन जप्त केलं आहे. ज्याची बाजारात किंमत ६९ लाख ६० हजार इतकी आहे. यातील याकूब हा परदेशी नागरिक असून तो मूळचा टांझानियाचा राहणारा आहे.

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

loading image
go to top