Mumbai: महाविद्यालयीन यिन निवडणुकीची जय्यत तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yin
महाविद्यालयीन यिन निवडणुकीची जय्यत तयारी

मुंबई : महाविद्यालयीन यिन निवडणुकीची जय्यत तयारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तरुणाईला उत्‍सुकता असलेल्या ‘यिन’ च्या महाविद्यालय निवडणूक प्रक्रियेची सर्वत्र जय्यत तयारी झालेली आहे. राज्यभरातील विविध महाविद्यालयांत ही प्रक्रिया राबविली जात आहे. यानिमित्ताने तरुणाईला नेतृत्‍व करण्याची संधी मिळणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ‘सकाळ’ माध्यम समूहाचे ‘यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क’ अर्थात (यिन) च्या ॲपवरून ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे.
राज्यभरातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सज्ज झालेले आहेत तर काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. राज्यभरातील अनेक तरुण-तरुणी या व्यासपीठाकडे नेतृत्व विकासाचं व्यासपीठ म्हणून पाहतात.

हेही वाचा: बालविवाह रोखा, अन्यथा पदाला मुकाल : रूपाली चाकणकर

राज्‍यस्‍तरावर नेतृत्‍वाची संधी
नेतृत्व विकासाच्या निवडणुका घेत, महाराष्ट्राचे शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळ दरवर्षी तयार होत असते. महाविद्यालयीन अध्यक्षापासून, जिल्हा अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री पदाचे दावेदार आणि शेवटी मुख्यमंत्री निवडला जातो. तसेच या मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येते. सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून नेतृत्व विकास ही प्रक्रिया देशामध्ये पहिल्यांदाच महाविद्यालयीन तरुणाईसाठी सकाळ माध्यम समूहाच्या ‘यिन’ ने सुरू केली आहे. राज्यस्तरावर नेतृत्व करायचे असेल तर आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करा आणि सहभागी व्हा..! देशातील सर्वात मोठ्या ‘यिन’ नेटवर्कमध्ये.

हेही वाचा: पुणे : सट्ट्यात हरलेल्या 4 लाखांच्या वसुलीसाठी अपहरण


नाशिक : केटीएचएम महाविद्यालयातून आपला उमेदवारी अर्ज ‘यिन’ चे राज्य निवडणूक अधिकारी तथा संपादक संदीप काळे यांच्याकडे सुपूर्द करताना ‘यिन’ उमेदवार.

loading image
go to top