मुंबई : भाजप आमदाराशी संबंधित कंपनीत डाटाचोरी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Data theft

मुंबई : भाजप आमदाराशी संबंधित कंपनीत डाटाचोरी..

मुंबई : मुंबई भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या ग्रीनविच मेरिडियन लॉजिस्टिक नावे कंपनीने दिलेल्या डाटा चोरीच्या तक्रारी वरून पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका अज्ञात व्यक्तीने कंपनीच्या संगणक प्रणालीवर अनधिकृत करून त्यांच्या क्लायंटचे तपशील असलेल्या महत्त्वपूर्ण फाइल चोरल्या. संशयिताने नंतर चोरलेली फाईल कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याला ई-मेल केली ज्याने नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर स्वतःची लॉजिस्टिक कंपनी सुरू केली होती. पवई येथे मुख्यालय असलेल्या आणि मालाची आयात-निर्यात करणाऱ्या ग्रीनविच मेरिडियन लॉजिस्टिकचे आयटी व्यवस्थापक धीरेंद्र श्रीवास्तव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार मिहिर कोटेचा कंपनीचे संचालक आहेत.

माजी कर्मचाऱ्यावर संशय

पोलीस तक्रारीनुसार श्रीनिवासन रमेश नावाचा कोटेचा यांच्या कंपनीत प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद येथील कंपनीच्या कार्यालयांचे कामकाज पाहत होता. त्यांनी 9 एप्रिल 2021 रोजी सेवेचा राजीनामा दिला आणि नंतर स्वतःची कंपनी लॉजिस्टिक्स सेवा देणारी कंपनी सुरू केली.श्रीनिवासन रमेशच्या राजीनाम्यानंतर, कंपनीच्या ईमेल खात्यावर त्याचा प्रवेश बंद करण्यात आला.

ईमेलमुळे मामला उघड

त्याच महिन्यात, कंपनीच्या चेन्नई कार्यालयातील आणखी एक कर्मचारी अजितकुमार यांनी राजीनामा दिला आणि रमेशच्या नव्याने सुरू झालेल्या कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झाले. 19 ऑक्टोबर 2021 रोजी, कंपनी संचालक ठक्कर यांनी तक्रारदार आणि वित्त व्यवस्थापक यांची बैठक बोलावली आणि त्यांना कळवले की, त्यांच्या कंपनीचे माजी प्रादेशिक व्यवस्थापक रमेश यांच्या जुन्या कंपनीच्या ईमेल खात्यावरून त्यांना एक ऑटो-फॉरवर्ड केलेला ईमेल प्राप्त झाला, जो त्यांच्या माजी कर्मचारी अजितकुमारच्या नवीन कंपनीच्या ईमेल खात्यातून पाठवला गेला होता.

तक्रारदार कंपनीच्या लक्षात आले की कोणीतरी अनधिकृतपणे त्यांच्या सिस्टममध्ये प्रवेश केला आणि कंपनीचा महत्त्वाचा डेटा चोरला. यामागे दोन माजी कर्मचार्‍यांचा हात असल्याचा संशय फिर्यादीला आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सध्या माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43B आणि 66 अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Mumbai Company Data Theft Related To Bjp Mla

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..