'हा माझ्या घरचा मामला, माझ्या मुलांचा मामला', झिशान सोबतच्या वादावर भाई जगतापांची भावना | Mumbai congress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'हा माझ्या घरचा मामला, माझ्या मुलांचा...', वादावर भाई जगतापांची भावना

'हा माझ्या घरचा मामला, माझ्या मुलांचा...', वादावर भाई जगतापांची भावना

मुंबई: काँग्रेस (Congress) एकाबाजूला मुंबई महापालिका निवडणूक (Bmc Election) पूर्ण ताकतीनिशी लढवण्याची तयारी करत आहे. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. वांद्रयातील काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी (Zishan siddiqui) यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai jagtap) यांची थेट सोनिया गांधींकडे तक्रार केली आहे.

या वादावर भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आमचा जो अंतर्गत वाद आहे. तो आम्ही बसून सोडवू. काँग्रेस मध्ये लोकशाही आहे सगळ्यांना विचार मांडण्याचा अधिकार आहे" असे भाई जगताप म्हणाले. "काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. थेट काँग्रेस हायकमांडकडे जाण्याचा अधिकार आहे. हा माझ्या घरचा मामला, माझ्या मुलांचा मामला आहे. मी सोडवेन. सगळीच माझी मुलं आहेत. मी त्यांची समजूत काढेन" असे भाई जगताप म्हणाले.

हेही वाचा: फ्लॅट शोधणाऱ्या महिला अधिकाऱ्याकडे सेक्सची मागणी, मुंबईतील घटना

आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस रणनितीदेखील आखत आहे. पण त्याचवेळी पक्षांतर्गत मतभेद देखील वाढत चालले आहेत. मुंबई काँग्रेसमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या मोर्चाच्या शिष्टमंडळातून आपलं नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचं झिशान सिद्दिकी यांनी तक्रारीत म्हटलं आहे. जेव्हा आपण शिष्टमंडळात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपला जाहीर अपमान केल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

loading image
go to top