फ्लॅट शोधणाऱ्या महिला अधिकाऱ्याकडे सेक्सची मागणी, मुंबईतील घटना | Mumbai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women

फ्लॅट शोधणाऱ्या महिला अधिकाऱ्याकडे सेक्सची मागणी, मुंबईतील घटना

मुंबई: मुंबईत घर शोधणाऱ्या (Mumbai home search) एका महिला अधिकाऱ्याला ऑनलाइन लैंगिक छळाचा (Sexually harassed) सामना करावा लागला आहे. ही महिला एका टेक्नोलॉजी कंपनीत (Tech company) मोठ्या पदावर आहे. लॉकडाउन (Lockdown) लागल्यानंतर सदर महिला गुजरातमधील आपल्या घरी निघून गेली होती. आता जनजीवन पूर्वपदावर आलं असून कंपन्यांनी कार्यलयातून कामकाज सुरु केलं आहे. त्यामुळे मुंबईत ही महिला घर शोधत होती.

छळ करणाऱ्या व्यक्तीची प्रोफाईल बघितली तर तो, स्टॉकब्रोकर असून एका मोठ्या मॅनेजमेंट संस्थेतून पदवी घेतली आहे. फ्लॅट भाड्यावर देण्याच्या बहाण्याने फेसबुकवरुन तो महिलेच्या संपर्कात आला. त्याने महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली. त्याने महिलेला धमकावले सुद्धा.

हेही वाचा: VIDEO: जोडप्याचं पॅरासिलिंग सुरु असताना दोरी तुटली अन्...

"मी मालाड-गोरेगाव भागात घर शोधत होती. माझे एफबी अकाऊंट नव्हते. फ्लॅट शोधण्यासाठी म्हणून मी एफबीवर अकाऊंट बनवलं" असं महिलेनं सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. ती एफबीवर रिअल इस्टेट ग्रुपवर जॉईंन झाली होती व तिला कशा पद्धतीचे घर हवे, त्या बद्दल माहिती पोस्ट केली होती. काही जणांनी तिला प्रतिसाद दिला. रविवारी अक्षय सिंह नावाच्या एका व्यक्तीचा मेसेज आला. फ्लॅट कुठल्या ठिकाणी हवा, बजेट या बद्दल त्याने विचारणा केली.

हेही वाचा: समीर वानखडे जन्मापासून मुस्लिम? कोर्टात सादर केली कागदपत्र

तिने प्रतिसाद दिल्यानंतर त्याने फ्लॅटचा व्हिडीओ पाठवला व आपणच घराचे मालक असल्याचे सांगितले. "आम्ही फक्त १० मिनिट बोललो आणि अचानक चर्चेने वेगळं वळणं घेतलं" असं महिलेनं सांगितलं. तुला भाडं भरण्याची गरज नाही, असं अक्षय सिंहने सांगितलं. भाड देऊ नको, त्या बदलत्यात त्याने शारीरिक सुखाची मागणी केली. नंबर ब्लॉक केला, तर फोन नंबरवरुन बनावट अकाऊंट बनवून 'कॉल गर्ल' म्हणून पोस्ट करेन अशी धमकी त्याने दिली. अखेर महिलेने त्या व्यक्तीचं प्रोफाईल ब्लॉक केलं व चॅटचे स्क्रिनशॉट मुंबई पोलिसांना टि्वट केले. मुंबई पोलिसांनी त्या महिलेला गुजरात सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याची सूचना केली.

loading image
go to top