चित्र काढताना बोरिवलीतल्या हेत्वीसोबत घडली दुर्देवी घटना; मनाला चटका लावणारा शेवट | Borivali | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्र काढताना बोरिवलीतल्या हेत्वीसोबत घडली दुर्देवी घटना

चित्र काढताना बोरिवलीतल्या हेत्वीसोबत घडली दुर्देवी घटना

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत (Mumbai) एका ११ वर्षाच्या मुलीचा ह्दयद्रावक शेवट झाला. मनाला चटका लावणाऱ्या या घटनेने सर्वचजण हळहळले. हेत्वी मेहता (Hetvi Mehta) असे मृत मुलीचे नाव आहे. हेत्वी हस्तकलेमध्ये गुंतलेली असताना तिचा १० व्या मजल्यावरुन पडून दुर्देवी मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. बोरिवलीत (Borivali) एका टॉवरमध्ये (Tower) शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली.

हेत्वी घराच्या गॅलरीत हस्तकलेचं काम करत होती. त्यावेळी अजाणतेपणी तिच्याकडून गॅलरीची जाळी कापली गेली आणि ती खाली पडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. गॅलरीमध्ये कॅमेरे नसल्यामुळे पोलिसांना ठोस निष्कर्ष काढता आलेला नाही. गॅलरीला ग्रिलही नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: काशिफ खान वानखेडेंचा कलेक्टर आहे, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

बोरिवली लिंक रोडवर असलेल्या AHCL टॉवरमध्ये हेत्वी आजी-आजोबा आणि आई सोबत राहत होती. शनिवारी संध्याकाळी ४.४० च्या सुमारास टॉवरला लागून असलेल्या पदपथावरुन जाणाऱ्या लोकांना मोठा आवाज ऐकू आला. "मोठा आवाज झाला आणि धुळीचे लोट उठले. सुरुवातीला काय झालय ते कळलं नाही. आम्ही पाहिलं तेव्हा एका लहान मुलीचा मृतदेह पडलेला होता. आम्ही लगेच सोसायटीला याची माहिती दिली" असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

हेही वाचा: शिक्षकाचं कर्तव्य विसरला, उर्दू शिकायला येणाऱ्या मुलीवर केला बलात्कार

लगेच पोलीस नियंत्रण कक्षाल कळवण्यात आले. मुलीला जवळच्या रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. आम्हाला यात घातपाताची शक्यता वाटत नाही. हा अपघात वाटतो, असे पोलिसांनी सांगितले. हेत्वी सहाव्या इयत्तेत होती.

loading image
go to top