मुंबईत विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या API ला पोलिसांनीच शिकवला धडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

love affair

मुंबई: विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या API ची पगारवाढ रोखली

मुंबई: विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या मुंबई पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला (Mumbai Cop) थेट पगार वाढीवर पाणी सोडावे लागले आहे. विवाहबाह्य संबंध (extramarital affair) ठेवले म्हणून या सहाय्यक पोलीस निरीक्षकाची वर्षभरासाठी पगारवाढ (increment) रोखण्यात आली आहे. धनराज प्रभाळे असे API चे नाव आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी API च्या पगारवाढीला स्थगिती देण्याची शिक्षा सुनावली आहे. (Mumbai Cops increment suspended for one year for having extramarital affair)

नागापाडा पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या धनराज प्रभाळेंनी फेसबुकवरुन महिलेबरोबर मैत्री केली. त्यानंतर तिच्याबरोबर विवाबाह्य संबंध प्रस्थापित केले. धनराज प्रभाळेंनी मागच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात महिलेबरोबर मैत्री केली. तिने तिच्या केटरींग बिझनेस संदर्भात जाहीरात पोस्ट केली होती. केटरिंग व्यवसायात बस्तान बसवण्यासाठी मदत करीन, असे प्रभाळेंनी त्या महिलेला आश्वानस दिल्याचे सूत्रांनी सांगतिले. त्यानंतर दोघांच्या भेटी-गाठी वाढल्याचे पोलिसांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: मुंबईतील 45+ नागरिकांच्या लसीकरणाबद्दल महत्त्वाची बातमी

दोघांचे संबंध बिघडल्यानंतर महिलेने वरिष्ठांकडे प्रभाळेंची तक्रार केली. धनराज प्रभाळेंनी आपले शोषण केल्याचा तिने आरोप केला. त्यानंतर प्रभाळे यांची खातेनिहाय चौकशी सुरु झाली. त्यात ते दोषी आढळले व त्यांच्या कृतीमुळे पोलीस खात्याचे नाव खराब झाले. त्यामुळे शिक्षा म्हणून वर्षभरासाठी त्यांची पगारवाढ रोखण्यात आली.

loading image
go to top