मुंबईतील 45+ नागरिकांच्या लसीकरणाबद्दल महत्त्वाची बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

मुंबईतील 45+ नागरिकांच्या लसीकरणाबद्दल महत्त्वाची बातमी

मुंबई: गेल्या 6 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईत (Mumbai) अखेर शुक्रवारपासून 45 वर्षांवरील (45+) नागरिकांचे लसीकरण (Vaccination) पुन्हा सुरू करण्यात आले. पालिकेने 45 वर्षांसाठी असलेल्या लसीकरण केंद्रांची (Centers) यादी जाहीर केली. दरम्यान, कोविन अ‍ॅपवर (Cowin App) दोन दिवस ऑनलाईन रजिस्ट्रेशन (Online Registration) करुन ज्यांना अपॉईंटमेंट मिळाली आहे, त्यांनाच डोस दिला जाईल, असे पालिकेकडून (BMC) सांगण्यात आले आहे. त्याशिवाय, दोन दिवस वॉक-इन (Walk In System) पद्धतीचे लसीकरण बंद असेल, असेही स्पष्ट करण्यात आले. (Mumbai Corona Vaccination Important Update for 45 plus People as Walk in system will be closed for 2 days)

हेही वाचा: "सातच्या आत घरात'च्या उदंड चर्चेनंतर..."; भाजपचा टोला

दोन दिवस सर्व लसीकरण केंद्र 80 टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस आणि 20 टक्के लाभार्थ्यांना कोव्हिशिल्डचा दुसरा डोस दिला जाणार आहे. तर, आज आणि उद्या (शनिवारी) असे दोन दिवस 80 आणि 20 टक्के अशा प्रमाणात लसीकरण केले जाणार आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस सर्व लसीकरण केंद्रांवर दिला जाणार आहे. पालिकेतर्फे प्रत्येक लसीकरण केंद्रांना फक्त 100 डोसेस देण्यात आले आहेत. दरम्यान, पालिकेकडून दोन दिवस वाॅक इन लसीकरण बंद केले आहे. फक्त ज्येष्ठ नागरिक म्हणजेच 60 वर्षांवरील आणि चालता -फिरता न येणार्या नागरिकांसाठीच वाॅक इन लसीकरण सुरू ठेवले आहे. त्यामुळे, 45 वर्षांवरील नागरीकांना आधी योग्य रजिस्ट्रेशन करुनच पहिला डोस घेता येईल.

हेही वाचा: सचिन वाझेपाठोपाठ आणखी एक अधिकारी पोलिस सेवेतून बडतर्फ

आज आणि उद्या जे डोस दिले जातील, त्याचे 80 आणि 20 टक्के असे प्रमाण आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करुनच 45 वर्षांवरील नागरीकांचा लसीकरण केले जाईल. 1 मार्चला ज्यांनी पहिला डोस घेतला त्यांना दुसरा डोस 24 मे पासून घ्यायचा आहे. त्यामुळे, 80 टक्के नागरिकांना पहिला डोस दिला जाईल. फक्त जे शिल्लक हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाइन वर्कर्स आहेत, ते दुसऱ्या डोससाठी येतील किंवा कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी येतील. कारण, 4 ते 6 आठवड्यापर्यंत कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेता येणार आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या दिवशी ऑन स्पाॅट रजिस्ट्रेशन असेल आणि गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी ऑनलाईन रजिस्ट्रेशन असेल.

- डाॅ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका आरोग्य विभाग

हेही वाचा: ठाकरे सरकारच्या मंत्र्याविरोधात 'भाजप'ने थोपटले दंड

वाॅक इन लसीकरण कधी घेता येईल?

सोमवार ते बुधवार या तीन दिवशी वाॅक इन लसीकरणासाठी येता येईल. पण, पहिल्या डोससाठी तशी सुविधा नाही. दुसरा डोस ऑनलाईन बुक करुन आणि किंवा ज्येष्ठ नागरिक आणि चालता - फिरता न येणार्‍या लोकांना वाॅक इन घेता येणार आहे असे ही डाॅ. गोमारे यांनी स्पष्ट केले. सकाळी 10 ते दुपारी 3 च्या दरम्यान लसीकरण केंद्रांच्या वेळेनुसार डोस घेता येणार आहे. 197 लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड दिली जाणार आहे तिथे सकाळी 11, 12, 1 आणि दुपारी 2 वाजता लसीकरण केले जात आहे. तर, फक्त 24 लसीकरण केंद्रांवर कोव्हॅक्सिन दिली जात आहे.

(संपादन- विराज भागवत)

loading image
go to top