esakal | मुंबईत कोविडच्या 331 नवीन रुग्णांचे निदान, तर 10 रुग्णांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona

मुंबईत कोविडच्या 331 नवीन रुग्णांचे निदान, तर 10 रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई  : आज 331 नवीन रुग्ण (Corona new patients) सापडले. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,35,112 इतकी झाली आहे. आज 403 रुग्णांनी कोरोनावर मात केली (Corona free patients) असून आतापर्यंत 7,11,920 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज 32,894 कोविड चाचण्या (Covid test) करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण 81,85,533 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. ( Mumbai corona details 331 new corona patients found-nss91)

 मुंबईत आज दिवसभरात केवळ 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 899 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यापैकी 9 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 5 पुरुष तर 5 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 40 वर्षा खालील आणि 40 ते 60 वयोगटा दरम्यानचे प्रत्येकी एक रुग्ण होता तर इतर 8 रुग्णांचे वय 60 वर्षाच्या वर होते.

हेही वाचा: दक्षिण मुंबईला कोरोनाचा विळखा, बाधितांच्या लसीकरणाची तपासणी

रुग्ण संख्या कमी झाल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 1,458 दिवसांवर गेला आहे. रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.5 % पर्यंत खाली आला आहे.  नव्या रुग्णांपेक्षा आज बरे होणारे रुग्ण अधिक असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97 % पर्यंत गेले आहे. तर रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 4,887 हजारांवर आला आहे.

मुंबईत सक्रिय कंटेंटमेंट झोन ची संख्या संख्या 3 झाली असून सीलबंद इमारतींची संख्या ही 47 पर्यंत खाली आली आहे. गेल्या 24 तासांत 1,953 अति जोखमीचे संपर्क समोर आले असून 830 जणांना कोविड काळजी केंद्र 1 मध्ये दाखल करण्यात आले आहे.

loading image
go to top