esakal | Mumbai: कोरोनामुळे डोळ्यांच्या रेटिनाला धोका, डोळ्यांच्या समस्या वाढल्या
sakal

बोलून बातमी शोधा

corona

मुंबई : कोरोनामुळे डोळ्यांच्या रेटिनाला धोका, डोळ्यांच्या समस्या वाढल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई :  देशभरात कोरोनामुळे डोळ्यांच्या रेटिनाला धोका निर्माण झाल्याचे अनेक रुग्णांमध्ये दिसून आले आहे. परंतु,  सध्या डोळ्याच्या रेटिनाला धोका पोहोचलेल्यांची संख्या ही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी आहे. मात्र, यात तरूणांना हा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जे कोरोना रुग्ण आहेत, त्यांनी पहिल्यांदा डोळे चेकअप करून घेणे, अत्यंत आवश्यक असल्याचे डॉ. अगरवाल्स आय रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अमर अगरवाल यांनी सांगितले.

डॉ. अगरवाल आय रुग्णालयाद्वारे पुढील 18 ते 24 महिन्यात मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात 20 आय केयर सुविधा उभारण्यासाठी 300 कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, अशी घोषणा शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.

हेही वाचा: बेळगाव : 'रायण्णा' मालमत्ता अखेर ताब्यात

मधुमेह व लहानपणापासून ज्यांना चष्मा लागला आहे, अशांना डोळ्यांच्या रेटिनाची समस्या उद्भवते. मात्र, ज्यावेळी डेंग्यूची साथ पसरली होती, तेव्हा डोळ्यांचा आजार मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. 40 ते 45 वर्षातील नागरिक ज्यांना मधुमेह, बल्ड प्रेशर आहे अशा रुग्णांना डोळ्याच्या रेटिनाच्या समस्येला सामोरे जावे लागते. कोरोना महामारीपासून मुंबईसह बाहेरील रुग्णांमध्ये 2 ते 3 टक्के डोळ्याच्या रेटिनाचा धोका वाढलेला आहे. 2 टक्के रेटिनाची समस्या ही मधुमेह रुग्णांमध्ये आढळून येते. तसेच ज्यांना लहानपणापासून चष्मा लागला आहे, अशा 5 टक्के रुग्णांमध्ये ही समस्या दिसून येते. त्यामुळे आता दरवर्षी डोळे चेकअप करून घेणे, गरजेचे असल्याचे आदित्य ज्योत रुग्णालय, मुंबईचे अध्यक्ष डॉ. एस. नटराजन यांनी सांगितले.

आय केअर चेनने जगभरात आपली साखळी तयार करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची विस्तार योजना आखली आहे. त्याअंतर्गत पुढील 3 वर्षात 100 नवीन रुग्णालये, 500 व्हिजन सेंटर्स तयार केले जाणार आहे.

मुंबईतील आदित्य ज्योत रुग्णालयाचे डॉ. अगरवाल्स आय रुग्णालयामध्ये विलिनीकरण करण्यात आले असून ती देशातील आय रुग्णालय चेनमधील 100 वी शाखा ठरली आहे.

loading image
go to top