esakal | Belgaum: 'रायण्णा' मालमत्ता अखेर ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

HIGH COURT

बेळगाव : 'रायण्णा' मालमत्ता अखेर ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : श्री संग्गोळी रायण्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह संस्थेच्या विरोधातील कारवाईमुळे कार्यालयाचे भाडे थकले आहे. शिवाय मालमत्ता कारवाईच्या कचाट्यात अडकली आहे. यासाठी याबाबत महत्वाचा निकाल न्यायालयाने दिला असून, हनुमाननगरातील कार्यालयाचे ठाळे उघडून मालमत्तेचा ताबा मालकाकडे आज (ता.८) देण्यात आला.

ठेवी आणि गुंतवणूक रक्कम परताव्यासाठी चालढकल केल्याच्या आरोपाखाली श्री संग्गोळी रायण्णा अर्बन को ऑप सोसायटीच्या विरोधात कारवाई करण्यात आली. कार्यालये सील केली. पण, या स्वरुपाच्या कारवाईमुळे मालत्ताधारकांची कोंडी झाली आहे. दर महिन्यांला मिळणारे भाडे थकले असून, कारवाई कचाट्यात मालमत्ता अडकल्या आहेत.

हेही वाचा: पिंपरी : सफाई कामगारांना सानुग्रह अनुदानापासून वंचित

त्यामुळे याविरुध्द न्यायालयात धाव घेण्यात आली होती. याबाबतचा निकाल न्यायालयात लागला असून, मालमत्तेधारकांना ताबा देण्याचा महत्वचा आदेश बजाविला आहे. यानुसार आज हनुमानगरातील कार्यालयाचे टाळे पोलिस व न्यायालय अधिकारी यांच्या उपस्थित उघडले. त्यानंतर त्याचा ताबा मालमत्तेधारक संतोष पावटे यांना दिला आहे. मालमत्तेचा ताबा मिळाला असून, थकीत २ लाख ६० हजार भाडे वसुलीसाठी प्रयत्न सुरु असल्याचे वकिलांनी सांगितले. मालमत्ताधारक पावटे यांच्या वतीने ॲड. सचिन शिवण्णावर यांनी काम पाहिले.

कंग्राळीतील कार्यालयाचाही ताबा

गेल्या महिन्यांत यास्वरुपाची कारवाई कंग्राळी के. एच. येथे करण्यात आली. त्याठिकाणी विनायक पाटील यांच्या मालकीची मालमत्ता कारवाईच्या कचाट्यात अडकली होती. पण, न्यायालय आदेशानंतर मालमत्तेचा ताबा त्यांना दिला. तसेच यापूर्वी रिसालदार गल्लीतील संग्गोळी रायण्णा संस्थेचे मुख्य कार्यालय ताब्यात घेऊन भाडे वसुली संदर्भात कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती ॲड. सचिन शिवण्णावर यांनी दिली.

loading image
go to top