शाब्बास मुंबई ! कोरोनाबाबतीत धारावीने पुन्हा करून दाखवलं, सर्वांचाच आत्मविश्वास वाढवणारी बातमी

मिलिंद तांबे
Friday, 22 January 2021

धारावी, दादर आणि माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात एकूण आज 5 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रूग्णांचा आकडा 13,535 वर पोहोचला आहे

मुंबई, ता. 22 : धारावीतील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा शून्यावर आली आहे. त्यामुळे धारावीकरांनी आणि मुंबईकरांनी पुन्हा एकदा सुटकेचा निश्वास सोडला.

मुंबईतील जी उत्तरमध्ये आज 5 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. मात्र धारावीमथ्ये आज दिवसभरात एकही नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला नाही. आज धारावीत एकही नवीन रुद्घ न सापडल्याने धारावीतील एकूण रुग्णसंख्या 3,904 इतकीच आहे. तर दुसरीकडे धारावीत सध्या केवळ 10 च  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. या दहा रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे.

महत्त्वाची बातमी : महाराष्ट्र बोर्डाच्या तब्बल २१ शाळा सुरु करण्यावर पालिकेचा शिक्कामोर्तब

तर दुरीकडे मुंबईतील दादरमध्ये आज केवळ 2 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 4,900 इतकी झाली आहे. दादरमधील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 82 इतकी झाली आहे.

माहीममध्ये ही आज फक्त 3 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 4,731 इतकी झाली आहे. माहीममध्ये 101 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

धारावी, दादर आणि माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात एकूण आज 5 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रूग्णांचा आकडा 13,535 वर पोहोचला आहे. यापैकी 193 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

जी उत्तरमध्ये आतापर्यंत 659 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीमध्ये 3,582, दादरमध्ये 4,645 तर माहीममध्ये 4,486 असे एकूण 12,713 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

mumbai corona news no new corona 19 cases detected from highly populated dharavi slums   

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai corona news no new corona 19 cases detected from highly populated dharavi slums