महाराष्ट्र बोर्डाच्या तब्बल २१ शाळा सुरु करण्यावर पालिकेचा शिक्कामोर्तब

समीर सुर्वे
Friday, 22 January 2021

मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीने  21 महाराष्ट्र बोर्डाच्या (एस एस सी )च्या शाळा दहावी पर्यंत सुरु करणार आहे.

मुंबई: मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीने गुरुवारी केंद्रीय बोर्डाच्या (सीबीएसई) दहा शाळा सुरु करण्याबरोबरच 21 महाराष्ट्र बोर्डाच्या (एस एस सी )च्या शाळा दहावी पर्यंत सुरु करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे.

महानगर पालिकेच्या शाळा आठवीपर्यंत असल्याने त्यानंतर विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे अनेक वेळा विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेत नाही. विशेषत: मुलींची शाळा आठवी नंतर कायमची बंद होते. यावर उपाय म्हणून महानगर पालिकेने दहावी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याची मागणी नगरसेवकांकडून केली जात होती.

त्यानुसार महानगर पालिकेने 21 शाळा दहावीपर्यंत सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. तसा प्रस्ताव शिक्षण समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला शिक्षण समितीने मंजूरी दिली आहे. या शाळा विना अनुदानित असून सर्व खर्च पालिका करणार आहे. तसेच, पालिकेच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महानगर पालिकेने जोगेश्‍वरी येथे सीबीएसई बोर्डाची शाळा सुरु केली आहे. या शाळेला मिळालेल्या प्रतिसादामुळे महानगर पालिकेने आता दहा ठिकाणी या बोर्डाच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रस्तावालाही शिक्षण समितीने मंजूरी दिली. या विद्यार्थ्यांनाही महानगर पालिकेच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच सुविधा मिळणार आहे.

हेही वाचा- कोविड लसीच्या चौकशी कॉल्समध्ये वाढ, दररोज 50 हून अधिक कॉल्स

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

bombay Municipal Corporation Education Committee start 21 Maharashtra Board schools


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bombay Municipal Corporation Education Committee start 21 Maharashtra Board schools