esakal | Mumbai: कोरोना काळात मुंबईत पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे झाले दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

प्राथमिक शिक्षण

मुंबई : कोरोना काळात मुंबईत पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे झाले दुर्लक्ष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना काळात मुंबई आणि परिसरात पूर्व प्राथमिक शिक्षणाकडे सरकार स्थानिक प्रशासनाचे खूप मोठे दुर्लक्ष झाले. यात सर्वाधिक परिणाम भाग बालवाडी, खासगी संस्थांकडून देण्यात येणाऱ्या नर्सरी आदी शिक्षणावर झाला असल्याचा निष्कर्ष विधी सेंटर फोर लीगल पॉलिसी या संस्थेने जाहीर केलेल्या एका अहवालातून काढला आहे. अनेक पालकांच्या ऑनलाईन शिक्षणाची आणि त्यांच्याकडे असलेल्या साधनांची वस्तुस्थिती या अहवालात मांडत पूर्व प्राथमिक शिक्षणावर चिंता व्यक्त केली आहे.

'कोरोना काळात पूर्व प्राथमिक शिक्षण पालक आणि शिक्षकांची भूमिका' असे या अहवालाचे नाव असून यासाठी मुंबईत बालवाडी आणि आकांक्षा फाउंडेशननेही आपले योगदान दिले आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी मागील १८ महिन्यांचा आढावा घेण्यात आला आहे. मुंबईतील ६७६ अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी त्यांची मते नोंदविण्यात आली. तर ५८ शिक्षकांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: सोलापूर : दूध पंढरी कर्मचारी पतसंस्थेला १५ लाख रुपयांचा नफा

यात पूर्व प्राथमिक शिक्षणात देण्यासाठी शाळा आणि इतर संस्थांमध्ये अनेक कमतरता समोर आणल्या आहेत. डिजिटल शिक्षण देताना पूर्व प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाव आणि पट नोंदणीत 30 ते 40 टक्क्यांची घट झाली तर तर मोठ्या प्रमाणात हे शिक्षण घेण्यासाठी असंख्य कुटुंबांनी प्राधान्य दिले नाही. मुलांना वेळ दिला नाही, या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले असल्याचे अहवालात म्हटले आहे.

ज्या शाळा आणि पालकांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी व्हॉटसअप सारखी साधने होती, त्यातील 86 टक्के कुटुंबांना या माध्यमातून तर 56 टक्के कुटुंबांनी झूम, गुगल मिट सारखी माध्यमे वापरली तर शाळा बंद राहिल्याने डिजिटल मोड वर शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना थेट शिक्षण देता येत नाही म्हणून चिंता व्यक्त केली. डिजिटल मोड मधून प्राथमिक शिक्षण हे प्रभावीपणे देता येत नाही, अनेक संकल्पना नीट समजावून देता येत नसल्याने, शिवाय हे शिक्षण देताना पूर्णपणे पालकांवर अवलंबून राहावे लागत असल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: पुणे : पोलिस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची पदपथावरच रात्र

या काळात आपल्या पाल्यांसाठी 24 टक्के कुटुंबांनी स्मार्ट फोन खरेदी केले तर 38 टक्के पालकांनी इतर साहित्याचा आधार घेतला. अनेक कुटुंबात प्रत्येकी तीन मुलांनी सरासरी दोन स्मार्ट फोन सामायिक केले. 45 टक्के कुटुंबांनी घरातील मोठ्या मुलांच्या शिक्षणासाठी असलेल्या मोबाईल आदी साहित्याला प्राधान्य दिले. महापालिकेच्या शाळा आणि खाजगी संस्था तील पालकांनी बाबाची शिक्षणासोबतच प्रत्यक्षरीत्या शाळा सुरू झाल्यावर त्यात सहभागी होण्याची इच्छा दर्शविली आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेत आणि इतर शाळांतील शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण देत असताना विविध प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत मूलभूत संकल्पना आणि कौशल्य शिकवण्यासाठी अनेक नवीन पद्धतीचा वापर केला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाइन शिक्षणाची आवड निर्माण झाल्याचेही अहवालात म्हटले आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी विधी संस्थेच्या पुजा पांडे आणि लीड एज्युकेशनच्या निशा वेर्णेकर यांनी योगदान दिलेले आहे.

loading image
go to top