मुंबईतल्या इमारतींमध्ये पसरतोय कोरोना, तब्बल २ हजारांहून अधिक मजले सील

समीर सुर्वे
Tuesday, 9 March 2021

गोरेगाव वगळता अंधेरीपासून कांदिवलीपर्यंत परिसरातील इमारतींमध्ये रुग्णसंख्या वाढू लागल्याने सील इमारती आणि मजल्यांची संख्या वाढली आहे.

मुंबई:  शहरातल्या इमारती आणि इमारतींमधील 495 नवे मजले सील करण्यात आले आहे. यात खासकरुन गोरेगाव वगळता अंधेरीपासून कांदिवलीपर्यंत परिसरातील इमारतींमध्ये रुग्णसंख्या वाढू लागल्याने सील इमारती आणि मजल्यांची संख्या वाढली आहे. तर, मलबार हिल ग्रॅन्टरोड येथील 206 मजले सील आहेत.

संपूर्ण मुंबईतील शनिवारी 2 हजार 450 मजले सील करण्यात आलेत. त्यातील निम्या पेक्षा जास्त इमारती या अंधेरी, मालाड, बोरीवली आणि कांदिवली या प्रभागातील आहेत. या परिसरातील 1 हजार 290 मजले सील करण्यात आले आहे. शहर विभागातील ‘डी ’ मलबार हिल ग्रन्टरोड या भागातील 206 इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण आढळल्याने मजले सील करण्यात आले आहे. इमारतींमधील सहा लाखांहून अधिक नागरिक सध्या कोविडच्या बंधनात आहेत. शुक्रवारी 2 हजार 193 मजले सील होते. यात अंधेरी, मालाड, कांदिवली, बोरीवली या भागातील 1 हजार 486 मजले आहेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोविडचे पाच पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यावर महानगर पालिका संपूर्ण इमारत सील करते. यात शनिवारपर्यंत 190 इमारती सील करण्यात आला होत्या. शुक्रवारी ही संख्या 174 होती.यात आर दक्षिण कांदिवली येथे 30,के पश्‍चिम अंधेरी जोगेश्‍वरी पश्‍चिम 30,एस भांडूप,पवई विक्रोळी येथे 23 इमारती शनिवारी सील होत्या. शुक्रवारी के पश्‍चिम 29,एस 20,चेंबूर , एम पश्‍चिम 20 इमारती सील होत्या.
 
चेंबूरला दिलासा?

चेंबूर परिसरात कोविडचे रुग्ण आढळल्यानं महानगर पालिकेने या प्रभागात प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला. त्याचे चांगला परिणाम दिसत आहे. या भागातील 20 इमारती शुक्रवारी सील होत्या. तर 24 तासात ही संख्या दोनने कमी होऊन शनिवारी 18 इमारती सील होत्या.

हेही वाचा- सचिन वाझे वादात, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी विधानसभेत रणकंदन

गोरेगाव सेफ झोन मध्ये?

गोरेगावला लागून असलेल्या प्रभागातील इमारतींमध्ये कोविडचे रुग्ण वाढत आहे. मात्र गोरेगाव पी दक्षिण हा प्रभाग त्या पासून बराच लांब आहे. शुक्रवारी या प्रभागातील 61 मजले सील होते. शनिवारी ही संख्या 49 वर आली होती. आर उत्तर मालाडमध्ये शनिवारी पाच मजले सील होते.

सील मजल्यांची संख्या

प्रभाग 5 फेब्रुवारी 6 फेब्रुवारी
     
के पश्‍चिम (अंधेरी जोगेश्‍वरी पश्‍चिम ) 487 493
आर दक्षिण (कांदिवली ) 233 288
आर मध्य(बोरीवली) 297 265
पी उत्तर (मालाड) 248 268
के पूर्व (अंधेरी जोगेश्‍वरी पूर्व ) 211 245
डी (मलबारहिल ग्रन्टरोड) 193 206

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Corona update 495 new floors in buildings city sealed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Corona update 495 new floors in buildings city sealed