मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 2274 दिवसांवर

 corona patients
corona patients sakal media

मुंबई : मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी वाढून 2187 वरून 2274 दिवस झाला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या नियंत्रणात (corona patients deceases) असल्याने पॉझिटिव्हिटी दर देखील 0.03 पर्यंत खाली आला आहे. मुंबईतील सक्रिय रुग्णांची (corona active patients) संख्या 2808 आहे. मुंबईत आज 2 कोविड मृत्यूची (Corona death) नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,302 वर पोहोचला आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे.

 corona patients
शेतकरी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाची जगभरात दखल

आज कोरोनाचे 238 नवे रुग्ण आढळले. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,60,738 वर पोहोचली आहे. आज 272 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,39,075 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत कोविड चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात 33,273 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,20,71,185 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com