मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या २३० नव्या रुग्णांची भर; एकाचा मृत्यू | Mumbai corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या २३० नव्या रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबईत आज केवळ एका कोविड मृत्यूची नोंद (corona death) झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,300 वर पोहोचला आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे. आज कोरोनाचे 230 नवे रुग्ण (corona new patients) आढळले. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,60,500 वर पोहोचली आहे. आज 204 रुग्णांनी कोरोनावर मात (corona free patients) केल्याने आतापर्यंत 7,38,803 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हेही वाचा: समाजसेवेच्या बुरख्याआड सुरु होतं समाजविघातक काम; वकिलाला अटक

 मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 2187 दिवस झाला आहे. मुंबईत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 2845 आहे. मुंबईत कोविड चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात 38,824 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,20,37,912 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

loading image
go to top