समाजसेवेच्या बुरख्याआड सुरु होतं समाजविघातक काम; वकिलाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajkumar rajhans

समाजसेवेच्या बुरख्याआड सुरु होतं समाजविघातक काम; वकिलाला अटक

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतल्या वकिलाची (Mumbai lawyer) चंदगडजवळच्या ढोलगरवाजी इंथली ड्रग फॅक्टरी (Drug factory) मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकानं (ANC) उद्ध्वस्त केली. राजकुमार राजहंस (Rajkumar rajhans) असं त्या वकिलाचं नाव आहे. कारखान्यावर छापा पडल्यानंतर तो फरार झाला होता. त्याला मालाडमधून अटक करण्यात आली (culprit arrested) आहे. तिथं काम करणाऱ्या त्याच्या हेल्परला अंमली पदार्थ विरोधी पथकानं आधीच अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

हेही वाचा: डोंबिवली : उच्छाद घालणारे माकड वन विभागाच्या ताब्यात

राजकुमार राजहंस हा ढोलगरवाडीचाच रहिवासी होता. वकिलीसाठी तो मुंबईत रहात होता. गावाशी नाळ जोडलेली राहील म्हणून हे फार्महाऊस घेतलंय, इथं मी अनेक सामाजिक कामं करणार असल्याचं त्यानं तिथल्या स्थानिकांना सांगितलं होतं. शाळा सुरु करणार, इथल्या तरुणांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवणार आणि त्यांना नोकऱ्या मिळवून देणार असल्याचंही तो सांगायचा, ही सगळी कामं करायला तुमची मदत लागेल असं सांगुन त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यानं स्थानिकांना 5 - 10 हजारांची मदतही केली होती असं चौकशीत समोर आल्याचं अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पोल्ट्री आणि बकरीपालनाचा व्यवसाय

फार्महाऊसवर ड्रग बनवण्याचं काम सुरु आहे, याचा कुणाला संशय येऊ नये यासाठी फार्मवर पोल्ट्री आणि गोटफार्म सुरु केलेलं होतं.

स्वत:च करायचा विक्री

राजकुमार राजहंसची ड्रग विक्रीची कोणतीही साखळी नव्हती. तो स्वत:च दर आठवड्याला मुंबईतून एमडी ड्रग बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल घेऊन जायचा आणि येताना तयार झालेलं ड्रग स्वत: त्याच्या गाडीतुन घेऊन यायचा. मुंबईतल्या पेडलर्सनाही तो स्वत: ड्रग पुरवायचा.

गेली 3 वर्ष सुरु होता कारखाना; दर आठवड्याला 3 कोटींचं उत्पादन

गेल्या तीन वर्षांपासुन ओमडी ड्रगचा कारखाना सुरु असल्याची माहीती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या चौकशीत समोर आलीये. दर आठवड्याला तयार होणाऱ्या ड्रगची किंमत आंतरराष्ट्रीया बाजारात जवळपास 3 कोटी होती.

loading image
go to top