मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या १८४ नव्या रुग्णांची नोंद; ४ जणांचा मृत्यू | Mumbai corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या १८४ नव्या रुग्णांची नोंद; ४ जणांचा मृत्यू

मुंबई : कोविड बाधित रुग्णसंख्या (corona infection) दोनशेच्या आत आणण्यात महानगरपालिकेला (bmc) यश आले असुन आज केवळ 184 नवीन रुग्णांची (corona new patients) नोंद झाली. कोविड काळातील ही निच्चांकी नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी 265  नवे रुग्ण आढळले होते. रुग्ण दगावण्याचे प्रमाण मात्र 2 वरून 4 वर गेले आहे.

हेही वाचा: मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचा धोका वाढला ; 7 दिवसांत रुग्ण संख्या दुप्पट

कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,59,593 वर पोहोचली आहे. आज 259 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,37,930 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मुंबईत आज ही 4 कोविड मृत्यूची नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,296 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे.

मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी काहीसा कमी होऊन 2010 दिवस झाला आहे.सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत 2775 झाली आहे. मुंबईत कोविड चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात कोविड चाचण्या तुलनेने कमी झाल्या असुम आज केवळ 23,723 चाचण्या झाल्या.मुंबईत आतापर्यंत 1,19,04,046 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

loading image
go to top