मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या नव्या 365 रुग्णांची भर; 4 जणांचा मृत्यू

corona update
corona updatesakal media

मुंबई : आज कोरोनाचे नवीन रुग्ण (corona new patients) तसेच मृतांचा आकडा (corona deaths) काहीसा कमी झाला असून आज 365 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर आज दिवसभरात 4 कोविड मृत्यूची नोंद झाली. मुंबईत एकूण मृत्यूचा आकडा 16,015 वर पोहोचला आहे.

corona update
भविष्यात आकाशगंगेचा अभ्यास करण्यास अधिक स्पष्टता; श्रुती बडोले यांचा समावेश

आज 365 नवीन रुग्ण रुग्णांसह कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,34,702 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात 232 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,11,554 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.मुंबईत सध्या 4666 सक्रिय रुग्ण आहेत.

 दरम्यान आज 35,851 चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्हीटी दर 1.01 टक्के इतका आहे. आतापर्यंत 96,86,025 एवढ्या झाल्या आहेत. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1185 दिवस असा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com