esakal | Corona : मुंबईतील हायरिस्क कॉन्टॅक्ट मध्ये वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona : मुंबईतील हायरिस्क कॉन्टॅक्ट मध्ये वाढ

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत (Mumbai) लॉकडाऊन (lockdown) शिथिल झाला, रेल्वे बाजारात गर्दी दिसू लागली. परिणामी कोरोना बधितांच्या (corona patients) संख्येत काहीशी वाढ झाली. या बधितांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा आकडाही वाढला असून गेल्या 24 तासात साधारणता साडेतीन हजार लोक बधितांच्या संपर्कात आली आहेत. त्यातील 68 टक्के लोकं ही हाय रिस्क मध्ये (High risk contact people) आहेत.

हेही वाचा: मुंबईत मलेरियाची रुग्णवाढ; घरातच सापडतोय डेंगींचा डास

मुंबईत दररोज 450 ते 500 हजार नवीन रुग्ण सापडत आहेत. गेल्या 24 तासात बाधित रुग्णाच्या संपर्कात 3349 लोकं आले. महत्वाचे म्हणजे त्यातील 2287 (68 %) लोकं हाय रिस्क मध्ये आहेत. तर 1062 (32 %) लोकं लो रिस्क मधील आहेत. संपूर्ण कोविड काळात 81,19,004 लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले गेले,त्यातील 45,45,752 (56%) हाय रिस्क तर 35,37,252 (44%) लोक लो रिस्क मध्ये असल्याचे आढळले.

मुंबईत दररोज सरासरी 35 ते 40 हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यात 1 टक्क्यांपेक्षा अधिक लोकं पॉझिटिव्ह येत आहेत. 'पॉझिटिव्हीटी रेट' मध्ये गेल्या आठवड्याभरात काहीशी वाढ दिसली आहे. त्यात काही डेल्टा विषाणूंचे काही प्रकार समोर येत आहेत. मात्र काही ना काही निमित्ताने होणाऱ्या गर्दीने चिंतेत भर घातली आहे.वाढत्या गर्दीमुळे डेल्टा सारख्या विषाणूंचा फैलाव होण्याचा धोका अधिक असून कोरोना पेक्षा गर्दी अधिक घातक असल्याचे मत राज्य विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी मांडले.

तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. त्यातच सध्या उत्सवांचे दिवस असल्याने बाजार,रस्ते,मॉल, रेल्वे,बस मध्ये लोकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय आंदोलने,सभा,समारंभ यामुळे देखील संसर्ग अधिक जोमाने पसरण्याची शक्यता आहे.यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यांची अंमलबाजावणी गरजेची आहे. त्यामुळे लोकांची गर्दी टाळणे तसेच डबल मुखपट्टीचा वापर करणे गरजेचे आहे असे मत राज्य विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी व्यक्त केले आहे.

loading image
go to top