मुंबईत कोविड चाचण्या वाढवल्या; दिवसभरात 41 हजाराहून अधिक चाचण्या | Mumbai corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona test

मुंबईत कोविड चाचण्या वाढवल्या; दिवसभरात 41 हजाराहून अधिक चाचण्या

मुंबई : मुंबईत कोविड चाचण्या (Mumbai corona test) वाढवण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात 41,078 कोविड चाचण्या केल्या गेल्या. महानगरपालिका चाचण्यांची (BMC corona test) संख्या वाढवत असून आतापर्यंत 1,18,67,158 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूने (corona deaths) पुन्हा शून्याकडे वाटचाल सुरू केली आहे.

हेही वाचा: "कंगना कसली झाशीची राणी, ती तर पत्त्यांच्या कॅटमधली राणी"

आज केवळ 2 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मृत्यू नियंत्रणात आले आहेत. तर गुरूवारच्या तुलनेत कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली. आज 247  नवे रुग्ण आढळले. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,59,328 वर पोहोचली आहे. आज 331 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,37,671 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

आज 2 कोविड मृत्यूची नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,290 वर पोहोचला आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 2104 दिवस झाला आहे. मुंबईत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 2819 आहे.

loading image
go to top