39 टक्के रुग्णांचा मृत्यू ! मधुमेह, उच्च रक्तदाबासह कोविडही महत्वाचं कारण | Mumbai corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

39 टक्के रुग्णांचा मृत्यू ! मधुमेह, उच्च रक्तदाबासह कोविडही महत्वाचं कारण

मुंबई : मधुमेह (diabetes), रक्तदाब (blood pressure) आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनाही कोविडचा (corona infection) त्रास होत असेल तर त्यांच्यावर उपचार करणे कठीण होते. विविध आजारांनी कोविड झाल्यामुळे, कोरोना काळात (corona pandemic) एकूण मृत्यूंपैकी 39 टक्के लोक असे होते ज्यांना अनेक सहव्याधी होते. अशा परिस्थितीत, ज्या लोकांना आतापर्यंत पूर्णपणे लसीकरण (corona vaccination) झालेले नाही अशा सर्व लोकांना डॉक्टरांनी दुसरा डोस (vaccination second dose) घेण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा: मुंबई : SRA मध्ये घर मिळवून देण्याच्या अमिषानं अनेकांना लुटणाऱ्याला अटक

मुंबईत 11 मार्च रोजी पहिला कोविडचा रुग्ण आढळला होता, परंतु पहिला मृत्यू 19 मार्च रोजी नोंदवला गेला होता. त्यानंतर,  एकूण 605 दिवसांत 16 हजार 292 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, कोविडमुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी  6354 म्हणजेच 39 टक्के मृत्यू हे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या नागरिकांचा झाले होते. म्हणजेच, दररोज सरासरी 10 लोकांना विविध आजार आणि कोविडमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ही आकडेवारी रुग्णांना घाबरवण्यासाठी नाही तर त्यांना सावध करण्यासाठी सांगण्यात येत आहे, जेणेकरून ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेतील. आधीच अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

कोविड मृत्यू निरीक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, कोरोना विषाणू हीच एक मोठी समस्या आहे, हा जर इतर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या नागरिकांना झाला तर उपचार करणे कठीण होते. काहीवेळेस औषधे काम करतात, काही वेळा उपचारांचा फायदा होत नाही.  त्यामुळे, ज्यांनी दुसरा डोस घेतला नाही त्यांनी लगेच लस घ्यावी.

मास्क आणि लस आवश्यक

अनेक रुग्ण मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी निकामी आणि इतर आजारांनी त्रस्त होते, त्याला कोविडची लागण झाल्यामुळे अनेक रुग्णांची तब्येत खालावली, काही बरे झाले, पण काहींचा मृत्यूही झाला. लोकांनी पौष्टिक आहार घ्यावा. ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजार असल्यास लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, मास्क घालून फिरावे, कोविड नियमांचे पालन करावे.

- डॉ. दक्षा शहा, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी

32 लाख लोकांचा दुसरा डोस बाकी

दिलासा देणारी बातमी म्हणजे मुंबईकरांचा पहिला डोस पूर्ण झाला असला तरी अद्याप 32 लाख 899 जणांचा दुसरा डोस बाकी आहे. यापैकी अनेकांचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी पूर्ण झालेला नाही, तर 3.5 लाख लोक आहेत ज्यांनी कालावधी पूर्ण होऊनही दुसरा डोस घेतला नाही.

हेही वाचा: 'न्यायालयाला धमकी देऊन न्याय मिळत नाही,संप मागे घ्या' - परब

मुंबईची आकडेवारी

एकूण चाचण्या- 119,04,046

एकूण पॉझिटिव्ह केसेस- 7,59,593

एकूण मृत्यू - 16,292

रिकव्हरी झालेले - 7,37,930

दुप्पट दर - 2,026 दिवस

चाळ/झोपडपट्टी सील- 0

इमारती सील - 14

राज्य आकडेवारी

एकूण चाचणी- 6,39,70,588

एकूण पॉझिटिव्ह केसेस- 66,24,300

एकूण मृत्यू - 140583

रिकव्हरी झालेले - 64,67,879

मुंबईतील लसीकरणाची आकडेवारी

एकूण डोस - 1,52,90,474

पहिला डोस - 92,54,873

दुसरा डोस - 60,35,601

loading image
go to top