esakal | Corona Virus: मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा 6 लाखांच्या पार

बोलून बातमी शोधा

Mumbai Corona Virus

Corona Virus: मुंबईत कोरोना बाधितांचा आकडा 6 लाखांच्या पार

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा 6 लाखांच्यावर पोहोचला आहे. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 6,01,590 झाला आहे. मुंबईत बुधवारी 7684 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर सक्रिय रुग्णांचा आकडा 84 हजार 743 हजारांवर आला आहे.

काल दिवसभरात 62 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 12 हजार 501 वर पोहोचला आहे. काल मृत झालेल्यांपैकी 40 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 33 पुरुष तर 29 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या  रुग्णांपैकी 3 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते.  21 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 38 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

मुंबईत बुधवारी 6790 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 5,03,053 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 84,743 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबईत कोरोना चाचण्यांवर  भर देण्यात येत असून आतापर्यंत 50 लाख 75 हजार 152 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 1.42 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 48 दिवसांवर आला आहे.

हेही वाचा: Maharashtra Lockdown: फक्त 'या' लोकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा

मुंबईत 114 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 1,198 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 36 हजार 531 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. काल कोविड काळजी केंद्र 1 मध्ये  अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 1,002 करण्यात आले.

जी उत्तर मध्ये 215 नवे रुग्ण

जी उत्तर मध्ये बुधवारी 215 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 22 हजार 955 झाली आहे. धारावीत काल 30 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6166 वर पोहोचली आहे. दादरमध्ये 108 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 8351 झाली आहे. माहीम मध्ये 77 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 8 हजार 438 इतके रुग्ण झाले आहेत.