esakal | चिंताजनक बातमी: मुंबईत केवळ 20 व्हेंटिलेटर शिल्लक

बोलून बातमी शोधा

चिंताजनक बातमी: मुंबईत केवळ 20 व्हेंटिलेटर शिल्लक

मुंबईत केवळ 20 व्हेंटिलेटर बेड शिल्लक राहिल्याने आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आली आहे.

चिंताजनक बातमी: मुंबईत केवळ 20 व्हेंटिलेटर शिल्लक

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: मुंबईत केवळ 20 व्हेंटिलेटर बेड शिल्लक राहिल्याने आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आली आहे. आयसीयू बेडची देखील वाईट अवस्था असून केवळ 60 आयसीयू बेड शिल्लक असल्यानं मुंबईतील कोविडची परिस्थिती अधिक चिघळलेली दिसते. देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण मुंबईत सापडत आहेत. गेल्या आठवड्याभरात मुंबईत 54 हजार 787 नवे रुग्ण सापडले आहेत. तर  232 रुग्ण दगावले आहेत. मुंबईत पॉझिटिव्हीटी दर 11.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

महापालिकेच्या वॉर रूम डॅशबोर्डवरील उपलब्ध माहिती नुसार, मुंबईत एकूण 1330 व्हेंटिलेटर बेड्स आहेत. त्यातील 1310 बेड्स भरले असून केवळ 20 बेड रिक्त आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत आयसीयू बेड्सची एकूण संख्या 2542 इतकी असून त्यातील 2482 बेड भरले आहेत. तर केवळ 60 बेड रिक्त आहेत.  9934 ऑक्सिजन बेड असून त्यापैकी 8540 बेड भरले आहेत. 1394 बेड रिक्त आहेत. दररोज वाढती रुग्णसंख्या पाहता गंभीर रुग्णांचा बेड्सचा तुटवडा जाणवू शकतो.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
मुंबईत केवळ 5199 बेड उपलब्ध

डिसीएचसी, डिसीएच आणि सीसीसी 1 रुग्णालय मिळून एकूण 25 हजार 455 बेड्स असून त्यातील 20 हजार 256 भरले आहेत. तर केवळ 5199 बेड्स रिक्त असल्याची माहिती पालिकेच्या कोविड डॅशबोर्डवर देण्यात आली आहे.

हेही वाचा- पालिका अॅक्शन मोडमध्ये, आठवड्याभरात हजाराहून अधिक  नवे ICU बेड्स 

1272 रुग्ण गंभीर

मुंबईत एकूण 92 हजार 464 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातील 75 हजार 893 रुग्ण असीम्टेमॅटिक तर 15 हजार 299 रुग्ण सीम्टेमॅटिक आहेत. हे सर्व रुग्ण स्थिर असून 1 हजार 272 रुग्ण गंभीर आहेत.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Corona Virus Updates Only 20 ventilators left in City