esakal | मुंबईतील रूग्णसंख्या आटोक्यात; नव्या रूग्णांचा आकडा 700च्या खाली
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Update

मुंबईतील रूग्णसंख्या आटोक्यात; नव्या रूग्णांचा आकडा 700च्या खाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गेल्या 24 तासात 500हून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई: शहरातील कोरोना आता हळूहळू आटोक्यात यायला लागला असून गेल्या 24 तासात केवळ 635 नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,29,250 इतकी झाली. महत्त्वाचे म्हणजे दिवसभराच्या कालावधीत 582 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7,04,259 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. (Mumbai Coronavirus Update new cases below 700 more than 500 patients corona free)

हेही वाचा: "हे तर सुनेला पोळ्या जमत नसल्याने पीठ अंगावर ओतून घेण्यासारखं"

मुंबईत दिवसभरात 10 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 654 इतका झाला. मृत झालेल्यापैकी 5 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 4 पुरुष तर 6 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 2 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते. 4 रुग्णांचे वय 40 आणि 60 च्या दरम्यान होते. तर 4 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात दिसत असून रुग्णवाढीचा सरासरी दर ही 0.7 % पर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 928 दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 % आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 6,989 हजारांवर आला आहे.

हेही वाचा: MPSC : 'या' विभागासाठी मोठी भरती, पंधरा हजार पदे भरणार!

धारावीत 6 तर दादरमध्ये 8 नवे रूग्ण

धारावीमध्ये गेल्या 24 तासांत 6 रुग्ण आढळले असून धारावीतील एकूण रुग्णांचा आकडा 6924 झाला आहे. तर धारावी सक्रिय रुग्ण वाढले असून 23 झाले आहेत. दादरमध्येही 8 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे दादरमधील एकूण रुग्णसंख्या 9788  झाली आहे. माहीममध्ये आज 3 नवे रुग्ण सापडले असून माहीम मधील एकूण रुग्ण 10,096 झाले आहेत.

loading image