टेक्नॉलॉजीने झाला लोचा! तिला वाटलं छेडतोय, पण तो तर...; 'ब्लूटूथ' प्रकरणात व्यावयायिकाची निर्दोष सुटका

आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असून, अनेकजण चालताना किंवा गाडी चालवताना हेडफोन किंवा ब्लूटूथच्या माध्यमातून गाणी किंवा एकमेकांच्या संपर्कात असतात.
court
court esakal

Mumbai Bluetooth Case : आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असून, अनेकजण चालताना किंवा गाडी चालवताना हेडफोन किंवा ब्लूटूथच्या माध्यमातून गाणी किंवा एकमेकांच्या संपर्कात असतात. मात्र, यामुळे रस्त्यावरील व्यक्तींचे गैरसमज होऊ शकतात. अशाच एका गैरसमजातील प्रकणात कळबादेवी न्यायालयाने ३२ वर्षीय व्यावसायिकाची निर्दोष सुटका केली आहे. या व्यक्तीवर एक महिला सॉफ्टवेअर अभियंतीचा महिनाभर छळ केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

हेही वाचाः सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

court
Pranab Mukherjee Birth Anniversary : मोदींच्या गुजरातची प्रणवदांना होती भुरळ; स्वतःची ओळख सांगायचे...

नेमकं प्रकरण काय?

हे प्रकरण २०१९ मधील असून, आरोप असलेली व्यक्ती संबंधित महिलेच्या जवळ येऊन 'गुड मॉर्निंग' असे म्हणायचा. या सर्व प्रकरणावर निकाल देताना न्यायदंडाधिकारी जुगलकिशोर पाठक म्हणाले की, जर पाठलाग करणाऱ्या व्यक्तीचा संबधित महिलेचा पाठलाग करण्याचा हेतू असता तर, त्याने संबंधित महिलेची ऑफिसची वेळ संपल्यानंतर तिचा नियमित पाठलाग केला असता.

court
Street Food Trend In 2022 : काठी रोल ते कच्छी दाबेली; देशभरात धुमाकूळ घालणारे स्ट्रीट फुड्स

मुंबई सारख्या शहरात सकाळच्यावेळी अनेकजण फिरण्यासाठी म्हणून निघतात. या दरम्यान अनेकजण ब्लूट्यूथ घालून बोलतात. याच गैरसमजातून एका महिलेने ३२ वर्षीय व्यक्ती दररोज आपल्या जवळ येऊन गुड मॉर्निंग म्हणत असल्याचा आरोप केला होता. त्यावर कळबादेवी न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाठलाग करणाऱ्या आरोपीची निर्दोष सुटका केली आहे.

court
Viswanathan Anand Birthday : करिअरचे 'हे' पाच टर्निंग पॉइंट अन् आयुष्यचं बदललं

सुनावणीवेळी, न्यायालयाने जर आरोपीचा पाठलाग करण्याचा हेतू असता, तर त्याने संबंधित महिलेचा ऑफिसमधून घरी परतत असताना पाठलाग केला असता. मात्र, अनेकजण सकाळच्यावेळी ब्लूटूथच्या माध्यामातून अनेकांशी बोलताना 'गुड मॉर्निंग' म्हणतात. त्यामुळे रस्यावरील नागरिकांचा गैरसमज होण्याची दाट शक्यता असते. त्यातूनच हा प्रकार घडला असावा असे मत न्यायदंडाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. मुंबई सारख्या वर्दळीच्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीचा पाठलाग करणे अशक्य असल्याचेही न्यायदंडाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com