'न्यायालयाने आदेश दिलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर एवढ्या तत्परतेने कारवाई नाही'; कंगनाप्रकरणी न्यायालयाचा पुन्हा BMCला शेरा

सुनिता महामुणकर
Monday, 28 September 2020

आज न्यायालयात कंगनाने आपली बाजू मांडली. दूपारी 3 नंतर बीएमसी आणि खासदार संजय राऊत आपली बाजू न्यायालयात मांडणार आहेत.

मुंबई - अभिनेत्री कंगना रनौतने बृहन्मुंबई महानगरपालिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. आज न्यायालयात कंगनाने आपली बाजू मांडली. दूपारी 3 नंतर बीएमसी आणि खासदार संजय राऊत आपली बाजू न्यायालयात मांडणार आहेत.

'महापौरांची ताबडतोब हाकलपट्टी करा; किरीट सोमय्यांचे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन

कंगना रनौतच्या बेकायदेशीर ऑफिसचे पाडकाम केल्यानंतर तीने मुंबई उच्च न्यायालयात पालिकेविरोधात दावा ठोकला होता. त्यात तीने खासदार संजय राऊत यांनाही पक्ष केले होते. आज त्याप्रकरणी झालेल्या सुनावणीत कंगनाने न्यायालयात म्हटले की, तीच्या ऑफिसवर झालेली कारवाई ही सूड भावनेतून झाली आहे. कंगनाने सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी राज्य सरकारला धारेवर धरले होते, त्यामुळे त्याचा बदला म्हणून तीच्या ऑफिसवर कारवाई करण्यात आली आहे. 

कंगनाने केलेल्या ट्विटवॉर बाबत न्यायालयाने तपशील मागवला आहे. कंगनाने असेही म्हटले आहे की, एखादे बांधकाम बेकायदेशीर असेल तर, त्यासंबधी रितसर सूचना देण्यात येऊन ते नियमित करण्यात येते. किंवा त्यासंबधी दुरुस्तीसाठी अवधी दिला जातो. परंतु अशी कोणतीही संधी कंगनाला देण्यात आली नाही. जाणीवपूर्वक तीला बांधकाम नियमित करण्याच्या संधींपासून दूर ठेवण्यात आले. कंगनाच्या बाजूने वकिल विरेंद्र सराफ युक्तीवाद करीत आहेत.

मुंबईतील पूरग्रस्तांना दहा हजारांचे मदत करा, भाजपची मोर्चाद्वारे मागणी

दरम्यान, न्यायालयाने पुन्हा एकदा बीएमसीला कंगनाच्या पाडकामावरून टोला लगावला आहे. न्यायालयाने अनेकवेळा बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे आदेश बीएमसीला दिले आहेत. त्याची कारवाई एवढ्या तत्परतेने होत नाही. कंगनाविरोधातील कारवाईसाठी बीएमसी एवढी तत्पर कशी असा खोचक टोला न्यायालयाने लगावला. दुपारी 3 वाजेनंतर होणाऱ्या सुनावणीत बीएमसीच्या बाजून एएसपीआय चिनॉय युक्तीवाद कऱणार आहेत. तर खासदार संजय राऊत यांच्यावतीनेही आज न्यायलयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai court again criticizes BMC in Kangana case