esakal | मुंबईत : कोविड तपासणीत १२.५ टक्क्यांनी घट
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Test

मुंबईत : कोविड तपासणीत १२.५ टक्क्यांनी घट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शहरात कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. दुसरीकडे चाचण्यांच्या संख्येतही घट झाली असून, गेल्या १० दिवसांत १२.५ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

१६ ते २५ ऑगस्टदरम्यान तीन लाख ८१ हजार ४०७ मुंबईकरांची चाचणी करण्यात आली. म्हणजे दररोज सरासरी ३८,१४० चाचण्या केल्या. २६ ऑगस्ट ते चार सप्टेंबरदरम्यान तीन लाख ३३ हजार ७३६ चाचण्या केल्या. म्हणजे दररोज सरासरी ३३,३७३ चाचण्या झाल्या. पालिकेच्या आकडेवारीनुसार गेल्या दहा दिवसांत चाचण्यांचा आलेख घसरल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांच्या संख्येत किंचित घट झाली आहे; परंतु आता तपासण्या वाढतील. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत चाचण्यांची संख्या चांगली असेल.

हेही वाचा: आयटी धोरणासाठी संकल्पना द्या : राज्यमंत्री सतेज पाटील

कोरोनाची लक्षणे असल्यास चाचणी करून घ्यावी. आरोग्य केंद्रे, रुग्णालयांमध्ये चाचणी सुविधा उपलब्ध आहे. रोगाचे निदान आणि उपचार वेळेवर झाल्यास बरे होण्याची शक्यता जास्त असते, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी, जास्तीत जास्त चाचण्या करणे गरजेचे आहे. रुग्ण कमी होत असले तरी चाचण्यांची संख्या कमी होऊ नये. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव केवळ चाचणी, ट्रेसिंग आणि उपचारांद्वारे कमी केला जाऊ शकतो.

- डॉ. ओम श्रीवास्तव, सदस्य, कोविड टास्क फोर्स आणि संसर्गजन्य रोग विशेषज्ञ

पालिका आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याकडे भर देत आहे. पालिकेची दररोज एक लाख चाचणी करण्याची क्षमता आहे. ६० हजारांपर्यंत अँटिजेन चाचण्या करण्याची तयारी आहे.

- डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

loading image
go to top