
अंधेरी, ता. ३ (बातमीदार) ः एका तरुणासोबत मैत्री करण्यास प्रवृत्त करून मित्रासोबतचा व्हिडिओ पालकांसह सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच ५३ वर्षांच्या परिचित व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना अंधेरीत उघडकीस आली आहे.
लैंगिक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच आरोपीसह वॉच ठेवणाऱ्या आरोपीस डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.